पॉन्झी स्किममध्ये क्रिकेटपटूंची गुंतवणूक, मोठा घोटाळा समोर, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:06 IST2024-12-06T09:05:49+5:302024-12-06T09:06:00+5:30
सीआयडीचे गुन्हे आणि रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार पांडिय म्हणाले की, पॉन्झी घोटाळ्यातील मुख्य आरोपी विरुद्ध राज्य सीआयडीने आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवले आहेत.

पॉन्झी स्किममध्ये क्रिकेटपटूंची गुंतवणूक, मोठा घोटाळा समोर, एफआयआर दाखल
गांधीनगर : साबरकांठा जिल्ह्यातील भूपेंद्र सिंह जाला यांनी सुरू केलेल्या पॉन्झी योजनेत अनेक क्रिकेटपटू आणि शिक्षकांनीही गुंतवणूक केली होती. आतापर्यंत पाच ते सहा क्रिकेटपटूंची नावे समोर आली असून, यात त्यांनी दोन कोटीपर्यंत गुंतवणूक केली आहे.
सीआयडीचे गुन्हे आणि रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजकुमार पांडिय म्हणाले की, पॉन्झी घोटाळ्यातील मुख्य आरोपी विरुद्ध राज्य सीआयडीने आतापर्यंत तीन एफआयआर नोंदवले आहेत.
गुजरात आणि इतर काही राज्यांसह सुमारे पाच ते सहा क्रिकेटपटूंनी जालाच्या पॉन्झी योजनेत गुंतवणूक केली होती. त्यांची गुंतवणूक काही लाखांपासून ते दोन कोटी रुपयांपर्यंत होती. घोटाळेबाज विश्वासार्हता मिळवण्यासाठी सेलिब्रिटींना त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पटवून देतात. गुंतवणुकीचे कारण शोधण्यासाठी क्रिकेटपटूंना चौकशीस बोलावले जाईल, असे सांगण्यात आले.
१७५ कोटींचे व्यवहार
आठवडाभरापूर्वी सीआयडीला आरोपी जाला याच्या दोन बँक खात्यांत १७५ कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले होते.
जालाने ‘बीझेड फायनान्शियल सर्व्हिसेस’ या कंपनीच्या अंतर्गत लोकांकडून पैसे गोळा केले होते आणि गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली होती.