पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 06:21 AM2019-02-21T06:21:23+5:302019-02-21T06:22:55+5:30

२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

Investigation of the attack on the Pulwama terror by NIA | पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

नवी दिल्ली : पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. या तपासात एनआयएला पोलीस, लष्कर, गुप्तहेर यंत्रणा मदत करतील.

२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अवंतीपोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. एनआयएने या प्रकरणी पुन्हा गुन्हा नोंदविला आहे. ३५० किलो आरडीएक्स भरलेली मारुती इको व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर जिथे धडकविण्यात आली, त्या ठिकाणाहून स्फोटकांचे नमुने एनआयएने याआधीच गोळा केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अकरा ते बारा संशयितांची या यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Investigation of the attack on the Pulwama terror by NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.