शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळाच्या प्रकरणांची चार आठवड्यांत चौकशी करा, केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 03:53 IST

एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एसएआय) २४ केंद्रांमध्ये २०१० ते २०१९ या कालावधीत लैंगिक छळाची ४५ प्रकरणे घडली. त्यापैकी प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांची चौकशी चार आठवड्यांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी शुक्रवारी दिले आहेत.रिजिजू यांनी सांगितले की, एसएआयच्या केंद्रांमध्ये लैंगिक छळाचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रकरणांची शक्य तितक्या लवकर चौकशी व्हावी यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्यात येतील. ही माहिती एसएआयने एका निवेदनात दिली आहे.एसएआयच्या केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या ४५ पैकी २९ घटनांत प्रशिक्षकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. जिमनॅस्टिक, अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान या घटना घडल्या होत्या. हा तपशील माहिती कायद्यान्वये केलेल्या एका अर्जाला एसएआयने दिलेल्या उत्तरातून उघड झाला आहे. यासंदर्भात एसएआयच्या एका माजी संचालकाने सांगितले की, खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या घटनांचा आकडा प्रत्यक्षात कितीतरी जास्त आहे.एसएआयने म्हटले आहे की, २०११ ते २०१९ या कालावधीत विविध क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनी लैंगिक छळ झाल्याच्या ३५ तक्रारी केल्या. त्यातील २७ तक्रारी प्रशिक्षकांच्या विरोधात आहेत. या प्रकरणांच्या चौकशीत दोषी आढळलेल्या १४ जणांना दंड ठोठावण्यात आला तसेच १५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अन्य प्रकरणांमध्ये काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली किंवा तक्रार दाखल झालेल्यांविरोधात सबळ पुरावे मिळू शकले नव्हते.विनयभंगप्रकरणी चौकशीचे आदेशभारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) देशभरातील २४ केंद्रांमध्ये दहा वर्षांत विनयभंगाची ४५ प्रकरणे पुढे आल्याचे एका अहवालात सांगण्यात आले होते. यावर केंद्रीय क्रीडामंत्री रिजीजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकार गंभीर असून याकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.दोषींना लहानसहान शिक्षाएसएआय केंद्रांमध्ये घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणांत पॉस्को कायदा तसेच कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी केलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे एसएआयने म्हटले आहे. मात्र, त्यातील बऱ्याच प्रकरणांत दोषींना लहानसहान शिक्षा देण्यात आल्या किंवा त्यांची बदली करण्यात आली असेही उजेडात आले होते. विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण शिबिरे एसएआय आयोजित करते. त्यात सहभागी होणाºया खेळाडूंना तक्रार नोंदविण्यासाठी एप्रिल २०१९पासून कॉल सेंटरही सुरू करण्यात आले.

टॅग्स :Indiaभारतsexual harassmentलैंगिक छळ