बचत भवनाच्या उद्घाटनाला मुहूर्त

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:59+5:302015-02-21T00:49:59+5:30

नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २२ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.

Introducing the inauguration of Savings Bhawan | बचत भवनाच्या उद्घाटनाला मुहूर्त

बचत भवनाच्या उद्घाटनाला मुहूर्त

गपूर: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवनाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. २२ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
जुन्या बचत भवनाचे नुतनीकरण करण्यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केले असून आता एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या कार्यालयाप्रमाणे बचत भवनाला रूप आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठका घेण्यासाठी आवश्यक ती सर्व सोय नवीन इमारतीत करण्यात आली आहे. फर्निचर बदलण्यात आले आहे. इमारतीचे बाह्य रुप पाहून तिचे उद्घाटन केंव्हा होणार याबाबत अनेक जण विचारणा करीत होते. त्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा ही होती. या साठी कधी काम अपूर्णतेचे कारण दिले जात होते तर कधी प्रशासकीय कारणे सांगितली जात होती. अखेर उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन होणार असल्याने प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)

े्न

Web Title: Introducing the inauguration of Savings Bhawan