शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day 2018 : 'योग' जुळून आला; आंतरराष्ट्रीय योग दिनी रामदेव बाबा गिनीज बुकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 12:46 IST

राजस्थानमधील कोटा येथे रामदेव बाबा यांच्याकडून योगासनांचं प्रात्यक्षिक

कोटा: चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशातील विविध ठिकाणी योगासनांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. योग दिनाच्या निमित्तानं राजस्थान सरकारनं कोटामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक जणांनी सहभागी घेतला. याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक जणांनी योगासनं करण्याचा विक्रम या कार्यक्रमात झाला. राजस्थानमधील कोटा येथे योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारनं विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी दोन लाखांहून अधिक जणांनी योगासनं केली. यामध्ये 5 ते 100 वर्ष वयोगटातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी एका व्यक्तीनं सलग 1 तास 3 मिनिटं शीर्षासन केलं. या व्यक्तीनं आधीचा एक तास शीर्षासन करण्याचा विक्रम मोडीत काढला. तर एका व्यक्तीनं दीड हजार पुश अप्स केले. राजस्थान सरकारनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला गिनीज बुकची टीमदेखील उपस्थित होती. एकाचवेळी दोन लाखांहून अधिक जणांनी योगासनं केल्यानं यावेळी विक्रमाची नोंद झाली. राजस्थान सरकारनं या कार्यक्रमासाठी रामदेव बाबांना निमंत्रण दिलं होतं. या कार्यक्रमात राजस्थानातील विविध जिल्ह्यांमधील लोक सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, संरक्षण दलाच्या जवानांचा समावेश होता.  

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनBaba Ramdevबाबा रामदेवRajasthanराजस्थान