शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

केवळ ९ रुपयांत आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, या कंपनीची धमाकेदार ऑफर, या मार्गांवर करता येईल प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:31 IST

International Flights: जर तुम्ही स्वस्तामध्ये परदेश प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. वियतजेट एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली - जर तुम्ही स्वस्तामध्ये परदेश प्रवास करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. वियतजेट एअरलाइन्सने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे. या ऑफरमधून तुम्हाला भारतातून व्हिएतनामदरम्यान केवळ ९ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येईल. या ऑफरसाठीची बुकिंग ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या ऑफरची मुदत २६ ऑगस्टपर्यंत आहे.

या ऑफरमध्ये तुम्ही बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रोजी जर तुम्ही तिकीट बुकींग केलं तरच तुम्हाला ही संधी मिळू शकते. विमान वाहतूक कंपनी विएतजेटने दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी माहिती देताना कंपनीने सांगितले की, भारतामधून व्हिएतनामध्ये विमान प्रवासासाठी कंपनी ३० हजार प्रमोशनल तिकिटे ऑफर करत आहे. या तिकिटांची किंमत ९ रुपयांपासून सुरू होत आहे. या ऑफरनुसार  १५ ऑगस्ट २०२२ ते २६ मार्च २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठीची बुकिंग ४ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. एअरलाईन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ४ ते २६ ऑगस्टदरम्यान, प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तिकीट बुकिंगवर प्रमोशनल तिकिटाचा लाभ घेता येणार आहे. 

एअरलाइन कंपनी विएतजेटचे कमर्शियल डायरेक्टर जय. एल. लिंगेश्वर यांनी सांगितले की, विएटजेट १७ मार्गांसाठी भारत आणि व्हिएतनामदरम्यान डायरेक्ट फ्लाईट ऑपरेट करणार आहे. त्यानंतरही एअरलाइन्स भारताच्या मुख्य डेस्टिनेशनला दक्षिण पूर्व आशिया, पूर्वोत्तर आशिया आणि आशिया-पॅसिफिकसोबत जोण्यासाठी विचार करत आहे.

त्यांनी सांगितले की, पाच मुख्य भारतीय शहरांतील प्रवासी आता दा नांगचे सुंदर शहर आणि नंतर होई एन, ह्यु इंपीरियल, माय सन अभयारण्य आणि जगातील सर्वात मोठी गुहा सोन डुंग सह आसपासच्या पर्यटनस्थळांच्या प्रवासासाठी डायरेक्ट फ्लाईट घेऊ शकता. दरम्यान, व्हिएतनामचे राजदूत फाम सान चाऊ यांनी सांगितले की, भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस येत आहे. व्हिसा प्रक्रियेला सरळसोपं केलं आहे. त्यासाठी आता दूतावासात जाण्याची गरज नाही. कंपनीने सांगितले की, सध्या व्हिएतनाममध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत.  

टॅग्स :airplaneविमानIndiaभारतVietnamविएतनाम