औरंगाबाद : ज्युनिअर महिला वकिलाने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात ॲड.नीलेश घाणेकर यांना खंडपीठाने दि. २६ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. बनावट गोळीबार प्रकरणात घाणेकर यांना दि. १६ जून रोजी जामीन दिल्यानंतर ते हर्सूल कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर बलात्कार प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात बुधवारी धाव घेतली. न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्यासमोर गुरुवारी हे प्रकरण सुनावणीस आले असता, न्यायालयाने घाणेकर यांना दि. २६ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. ॲड. महादेश्वरी म्हसे- ठुबे यांनी ॲड. घाणेकरांची बाजू मांडली. बलात्कार प्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्यांना दि. १९ जूनपर्यंत संरक्षण दिले होते. शुक्रवारी ही मुदत संपत असतानाच गुरुवारी खंडपीठाने दिलेल्या अंतरिम जामिनामुळे घाणेकर यांना दिलासा मिळाला आहे.
नीेलेश घाणेकर यांना अंतरिम जामीन
By admin | Updated: June 19, 2015 14:09 IST