शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाह शरियतला नाहीत मान्य, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 07:54 IST

Interfaith marriages: आंतरधर्मीय विवाहांना शरियतने मान्यता दिलेली नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी  म्हटले आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह इस्लामच्या दृष्टीने अवैध ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आंतरधर्मीय विवाहांना शरियतने मान्यता दिलेली नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी) सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी  म्हटले आहे. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह इस्लामच्या दृष्टीने अवैध ठरतात, असेही त्यांनी सांगितले.मुस्लीम युवकांनी बिगरमुस्लीम मुलींशी विवाह करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, आई-वडील, मशीद, मदरशांमधील मौलवी यांनी आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. आंतरधर्मीय विवाहांना सामाजिक विचारसरणी  व संकेतांनुसार मान्यता मिळाली असेल; पण इस्लामला असे विवाह मान्य नाहीत. एकाच ठिकाणी काम करत असताना मने जुळल्याने व पुरेशा धार्मिक शिक्षणाच्या अभावी सध्या आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणावर होत आहेत; मात्र बिगरमुस्लीम मुलाबरोबर लग्न झालेल्या मुस्लीम मुलीला पुढील काळात खूप अडचणींना तोंड द्यावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही मुलींना आपले प्राण गमवावे लागले, असेही या बोर्डाने सांगितले.देशात लव्ह जिहाद सुरू असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. उत्तर प्रदेशासह काही राज्यांत आंतरधर्मीय विवाहांवरून मध्यंतरी वादळ उठले होते. असे काही विवाह रोखण्याचेही प्रकार घडले होते; मात्र त्या घटनांचा उल्लेख न करता मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आपली मते व्यक्त केली आहेत.  

पाल्यांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवाn मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितले की, आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी सात सूत्रांचे पालन करणे आवश्यक आहे. n आई-वडिलांनी आपला पाल्य मोबाइलचा गैरवापर तर करत नाही ना, यावर लक्ष ठेवावे. n मुले-मुली एकत्र शिकतात, अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालू नये. आंतरधर्मीय विवाह करू नका, असा उपदेश मशिदीतील इमामांनी मुस्लीम समुदायाला दर शुक्रवारी करावा, आदी गोष्टींचा सात सूत्रांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :marriageलग्नIslamइस्लामIndiaभारत