शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लष्करी वैद्यकीय सेवेचे करणार एकत्रीकरण : लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 19:03 IST

पेशंट केअर, मेडीसिन आणि संशोधन या क्षेत्रांना एकत्र करावे लागते. हे तिन्ही विभाग एकमेकांवर अवलंबून आहे. यामुळे एकत्र काम करणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्देडेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळणार पायाभूत सुविधांवर देणार भर

निनाद देशमुख - पुणे : पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर या ‘लेफ्टनंट जनरल’ पदावर जाणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या, तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहे. त्या डेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकलच्या प्रमुख म्हणून काम सांभाळणार आहेत.   तिन्ही दलांच्या आरोग्यसेवेच्या एकत्रीकरणाबरोबर समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

येत्या काळात लष्करी वैद्यकीय सेवेपुढील आव्हाने आणि या पदावर असताना त्या काय करणार आहेत याबद्दल लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्याशी  साधलेला संवाद...

 

* पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात जेव्हा मी अधिष्ठाता होते, तेव्हा त्या ठिकाणी मल्टीडिसीप्लनरी रिसर्च युनीट तयार केले होते. दोन वर्षांत त्याचा चांगला फायदा होत आहे. आमच्याकडे विविध प्रयोगशाळेत चांगले काम होत आहे. एका  अंडर ग्रज्युएट विद्यार्थ्याने पेटंटही फाईल केले आहे. या प्रकारची यंत्रणा सगळीकडे सुरू करावी लागेल. 

‘लेफ्टनंट जनरल’ या पदावर बढती झाल्यावर तुमच्याकडे काय जबाबदारी असणार आहे?  ल्ल सीडीएस अंतर्गत असणाºया डेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स सर्व्हिसेस मेडिकल या पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. भविष्यात आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांच्या आरोग्यसेवेचे एकत्रीकरण करून, त्यांचे रिसोर्सेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापरायचे आहे. मेडिकल सर्व्हिसेस या आधीपासूनच ट्राय सर्व्हिसेस होत्या. मात्र, असे असतानासुद्धा त्यांच्या प्रशासकीय जबाबदाºया आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती. हे त्यामुळे या सर्वांचे एकत्रीकरण हे आयडीएसचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार हे काम करणे आव्हानात्मक असणार आहे. भविष्यात तुमच्या पुढची आव्हाने काय ? ल्ल काही बदल करायचा म्हटले की, विरोध हा ठरलेलाच असतो. कारण, साचेबद्धपणाने काम करण्याची सवय झालेली असते. जर एकांगी विचार करून थेट बदल करायचे ठरवले, तर लोक त्याला विरोध करतात. मात्र, माझ्या अनुभवानुसार आपल्याला भविष्यात जे बदल करायचे आहे, त्यासंदर्भात त्या विषयातील सर्वांनी एकत्र बसून चर्चा केल्यास त्यांना सहभागी करून संबंधित विषयातील समस्या समजून घेतले तर त्याला विरोध कमी होतो. यामुळे ‘टीमवर्क’हे महत्त्वाचे आहे. माझे आधीपासून असे म्हणणे आहे की, आयपेक्षा वूई महत्त्वाचे आहे. मीपेक्षा आम्ही हा पावित्रा घेतला, तर येणारी आव्हाने ही नक्कीच कमी होतील. दुसरी गोष्ट म्हणजे, आमची जी मेडिकल ब्रँच आहे ती संरक्षण मंत्रालयाकडे आहे आणि डिपार्टमेंट आॅफ मेडिकल अफेअर ही सीडीएसची ब्रँच आहे. त्यामुळे आम्हाल तिन्ही दलांचे एकत्रीकरणच करायचे नाही, तर या दोन्ही विभागांतील समन्वयही हा कायम ठेवायचा आहे. भविष्यातील लष्कराच्या आरोग्य सेवेतील बदल लक्षात घेऊन निर्णय घ्यायचे असतील, तर मेडिकल एज्युकेशन, हेल्थ केअर, संशोधनाबरोबरच या विभागातील मनुष्यबळाची संख्या आणि आणि तिन्ही दलांच्या आरोग्य सेवेचे एकत्रीकरण करणे हे एक आव्हान वाटते. याबरोबरच लष्कराच्या आरोग्य सेवेच्या प्रमुखांनी लष्करातील आरोग्य सेवेचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात लष्करी आरोग्य सेवेत कसे बदल करायचे, हे पण मला करायचे आहे. लष्करी वैद्यकीय सेवेपुढे सध्या काय आव्हाने आहेत ?ल्ल लष्कराच्या आरोग्य सेवेत आज झपाट्याने बदल होत आहे. प्रामुख्याने इमर्जन्सी मेडीसिन, पीडियाट्रिक मेडीसिन, नॉन कम्युनिकेबल आजार यात संशोधन होणे गरजेचे आहे.  मधुमेह, हायपरटेन्शन आणि कॅन्सर या सारख्या आजारांचेही प्रमाण वाढले आहे. हे एक आव्हान आहे. दुसरे म्हणजे, इमर्जिंग इन्फेक्शन. कारण आज नवीन कोरोनासारखे नवे व्हायरस उदयास येत आहेत. याच्यासाठी आपली तयारी हवी आहे. त्यामुळे संशोधनासाठी काम करणे गरजेचे आहे. यात मला चांगली संधी मिळाली आहे. कारण मी पंतप्रधानांच्या अ‍ॅडव्हायजरी कमिटीमध्ये आहे. त्यामुळे तिथल्या अनुभवाचा या ठिकाणी वापर करण्याची मला संधी मिळाली आहे.सध्या लष्करातील जवानांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने काय करणार आहात? ल्ल भारतीय लष्करातील जवानांचा फिटनेस चांगला आहे. कारण, त्यांना ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिले जाते, भविष्यात आम्ही लष्करांच्या दवाख्यान्यात ‘वेल नेस इनिशेटिव्ह’ सुरू करतोय. लोकांना साध्या आजारावर उपचार देण्याबरोबरच विविध आजारांची माहिती आणि त्या संदर्भातील उपाययोजना याची माहिती देण्यास आम्ही सुरूवात केली आहे. लष्कराच्या वैद्यकीय सेवेचे महासंचालक यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय.

लष्कराच्या दवाखान्यांचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांच्या विकासाठी काय करणार आहात ?ल्ल यासंदर्भात, आमचे आधीपासून काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याला आम्ही अ‍ॅन्युयल अ‍ॅक्विझिशन प्लॅन असे म्हणतो. यानुसार नव्या यंत्रणा आणण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतात. एक एक गोष्ट न घेता सर्व दवाखान्यांना एका व्यासपीठावर आणून गरजेनुसार लागणाºया साधनांचा रोडमॅप बनविला जातो. त्याप्रमाणे आमच्या दवाखान्यांचे आधुनिकीकरण होत राहते. पुण्यातील कमांड हॉस्पिटलचे याप्रमाणेचे आधुनिकीकरण झाले आहे. यासोबत आमच्या डॉक्टरांचे कौशल्य विकासासाठीही आम्ही प्रयत्न करतोय.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानWomenमहिलाMedicalवैद्यकीय