शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

'अयोध्येत मंदिर नव्हे, विद्यापीठ उभारा; नक्कीच रामराज्य येईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:55 PM

राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे

नवी दिल्ली: अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमीबद्दलल आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाष्य केलं आहे. त्या वादग्रस्त जागेवर मशीद असावी की राम मंदिर यावरुन विविध दावे-प्रतिदावे सुरू असताना सिसोदिया यांनी तोडगा सुचवला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एक विद्यापीठ उभारण्यात यावं, असं सिसोदिया म्हणाले आहेत. शिक्षणानंच देशात रामराज्य येईल, असंही ते म्हणाले.'त्या वादग्रस्त जागेवर भव्य मंदिर उभारल्यानं रामराज्य येणार नाही. मात्र शिक्षणानं देशात नक्कीच रामराज्य येईल. त्यामुळे दोन्ही पक्षकार सहमत असतील, तर त्या वादग्रस्त जागेवर नक्कीच एक विद्यापीठ उभारता येईल,' असा तोडगा सिसोदिया यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुचवला. या कार्यक्रमात सिसोदिया यांना आम आदमी पार्टीची राम मंदिराबद्दलची भूमिका विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ उभारण्याची कल्पना मांडली. विद्यापीठात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि परदेशी विद्यार्थीदेखील शिक्षण घेऊ शकतील, असं ते म्हणाले. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मनीष सिसोदिया यांनी जातीय राजकारण आणि शिक्षणावर भाष्य केलं. 'आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन रामराज्य आणता येईल. या प्रकरणावर सुरू असलेलं राजकारण रोखण्याची क्षमता फक्त आणि फक्त शिक्षणात आहे,' असं सिसोदिया म्हणाले. सध्या इतर देशांमध्ये काय सुरू आहे आणि आपल्याकडे नेमकं काय चाललं आहे, याचाही विचार व्हायला हवा, असं त्यांनी म्हटलं. 'मी नुकताच जपानला गेलो होतो. तिथे ज्या दिवशी हायड्रोजनवर चालणाऱ्या कारवर चर्चा सुरू होती, त्याचवेळी आपल्याकडे हनुमानाची जात कोणती, यावर राजकारण सुरू होतं. हे खूपच निराशाजनक आहे. ही परिस्थिती केवळ शिक्षणामुळेच बदलू शकते,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याAAPआपBJPभाजपा