शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

जनतेचा फायदा करण्याऐवजी मोदींनी तेलावरील अबकारी करात केली वाढ -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:43 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली.

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर इंधन तेलाच्या किमती घसरल्याचा जनतेला फायदा मिळवून द्या, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, त्याऐवजी मोदींनी इंधन तेलाच्या अबकारी करात वाढ केली, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.अबकारी करात वाढ केल्याने केंद्र सरकारला अतिरिक्त ३९,००० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली.मोदींचे लक्ष सरकार अस्थिर करण्याकडेतेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा केंद्र सरकारने जनतेला का मिळवून दिला नाही, या प्रश्नावर उत्तर देणे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत टाळले होते. त्याची व्हिडिओ फीतही राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटबरोबर झळकवली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी घसरल्या आहेत, याची नोंद घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष मध्यप्रदेशमधील लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्याकडे लागले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला होता. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असल्याने तेथील राज्य विधानसभेत तातडीने बहुमताची चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने शनिवारी केली होती.पेट्रोल १२, तर डिझेल १४ पैशांनी स्वस्तनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने सरकारी तेल विपणन कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर बारा, तर डिझेल्या दरात १४ पैशांनी कपात केली आहे. या दर कपातीमुळे दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ६९ रुपये ७५ पैसे, डिझेलचा भाव ६२ रुपये ४४ पैसे झाला आहे. शनिवारी इंधनावर उत्पादन शुल्कात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती; अन्यथा ही दरकपात मोठी असती. उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याने किरकोळ दर कमी ठेवला जात आहे. होणारा लाभ दरवृद्धीशी समायोजित करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क वाढविल्याने असे करणे जरूरी आहे, असे तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे.इंधनावरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यातून सरकारला ३९ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील विशेष उत्पादन शुल्क प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून ८ रुपये करण्यात आले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर दोन रुपयांवरून ४ रुपये करण्यात आले. रस्ता उपकरही प्रतिलिटर एक रुपयाने वाढवून प्रतिलिटर दहा रुपये करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व उपकरासह पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क प्रतिलिटर २२ रुपये ९८ पैसे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १८ रुपये ८३ रुपये झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार आले तेव्हा पेट्रोलवरील कर प्रतिलिटर ९ रुपये ४८ पैसे, तर डिझेलवरील कर प्रतिलिटर ३ रुपये ५६ रुपये होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी