Inspired by Latadidi's Rakshabandhan wishes - Narendra Modi | 'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा'

'लतादीदींच्या रक्षाबंधन शुभेच्छांमुळे मिळाली प्रेरणा'

नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त सोमवारी परस्परांना शुभेच्छा दिल्या. लतादीदींनी दिलेल्या शुभेच्छा हा माझ्यासाठी भावोत्कट क्षण आहे. या शुभेच्छांनी मला प्रेरणा व असीम ऊर्जा मिळाली आहे.

आपल्या देशातील करोडो माता-भगिनींच्या आशीर्वादाने हा देश यशाची नवनवीन शिखरे गाठणार आहे. लतादीदींना निरामय दीर्घायुष्य लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मोदी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ टिष्ट्वटरवर सोमवारी झळकविला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांनीही रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत,

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Inspired by Latadidi's Rakshabandhan wishes - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.