शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

"पहिल्या पगारातून वडिलांचं कर्ज फेडणार’’, लाखोंचं पॅकेज मिळाल्यानंतर लेकीचं भावूक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:39 IST

Inspirational Stories: जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे.

जमाना बदलला असला तरी आपला संघर्षाचा काळ आठवणीत ठेवणाऱ्या त्या काळात आई-वडिलांनी आपल्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टांची जाणीव ठेवणाऱ्या मुलांची काही उदाहरणं आपल्यासमोर अधूनमधून येत असतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील खोडा येथे राहून शिक्षण घेत यश मिळवून आज लाखोंच्या पॅकेजचं ऑफर लेटर मिळवणाऱ्या रोहिणी नावाच्या तरुणीची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे. खूप मेहनतीनंतर यशस्वी झालेल्या रोहिली मिश्रा हिला तिच्या बालपणीचे दिवस अजूनही आठवतात. जेव्हा तिने खूप शिकून घरची परिस्थिती बदलण्याचा स्वत:शीच निश्चय केला होता. आज तिने हा निश्चय खरा करून दाखवला.

रोहिणी मिश्रा या तरुणीची कहाणी खूप संघर्षाने भरलेली पण प्रेरणादायी अशीच आहे. गाझियाबादमधील खोडा परिसरात राहणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी कुटुंबांमध्ये इंद्रमोहन मिश्रा यांच्याही कुटुंबाचा समावेश होता. छोट्याशा भाड्याच्या खोलीत इंद्रमोहन मिश्रा त्यांची पत्नी सुषमा मिश्रा, मुलगी रोहिणी मिश्रा आणि मुलगा रोहित हे राहत होते. रोहिणी सांगते की, आमचं कुटुंब एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब होतं. पाचवीनंतर शिक्षण महाग झाल्याने मला आणि माझ्या भावाला वडिलांनी सरकारी शाळेत टाकले. तिथे शिक्षण सुरू असताना क्लासचा खूप लोड येत असे. पुढे नववीपर्यंत मी घरामध्ये खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवले.

रोहिणी मिश्राने पुढे सांगितले की, सेक्टर ६२ मध्ये योगदा सत्संग सोसायटीशी संबंधित काही लोक मुलांना शिकवतात, असं मला समजलं. जेव्हा मी या आश्रमातील काही लोकांना भेटले तेव्हा आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन इंजिनियर बनता येतं, असं मला समजलं. तेव्हा मी जेईई आणि नंतर अॅडव्हान परीक्षा उत्तीर्ण करायची असा निश्चय मनाशी केला. इथून माझ्या अभ्यासात प्रगती सुरू झाली. दहावीत मी गौतमबुद्धनगरमधील सरकारी शाळांमधून पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. तेव्हा मला ८९ टक्के गुण मिळाले.

बारावीसोबत जेईईची तयारीही मी करत होते. त्यावेळी मी बारावीत ८४ टक्के गुण मिळवत जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा मी पहिल्या प्रयत्नात जेईई क्लिअर करू शकले नाही. त्यामुळे मी बारावीनंतर एक वर्ष ड्रॉप घेतला. तेव्हा एका नव्यानेच सुरू झालेल्या कोचिंग क्लासमध्ये सवलत मिळत होती. मी तिथूनच अभ्यास केला. माझ्या वडिलांनी लोकांकडून कर्ज घेऊन माझ्या कोचिंगचा खर्च भागवला. त्यानंतर मी ७४८३ रँकसह उत्तीर्ण झाले. त्यामुळे माझी आयआयटी खडकपूर येथे निवड झाली. आता माझ्या शिक्षणाची चार वर्षे संपत आहेत.  येथूनच मला नोकरी मिळाली आहे. मला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधून २१ लाख रुपयांची सीटीसी ऑफर झाली आहे, अशी माहिती रोहिणी हिने दिली.

आता अजून तीन ते चार महिन्यांचं शिक्षण बाकी आहे. त्यानंतर नोकरीला सुरुवात झाल्यावर मी सर्वप्रथम वडिलांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करेन. माझ्यासारखी अनेक मुलं विचार करतात की आयआयटीसाखं महागडं शिक्षण कसं घ्यायचं. माझ्या कुटुंबालासुद्धा १०-१२ लाख रुपयांचा खर्च झेपला नसला. त्यामुळे मी बँकेमधून कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केलं. मात्र मला शिष्यवृत्ती आणि मिळालेली असल्याने मला १२ लाख नाही तर सहा लाख रुपयेच द्यावे लागले आहेत. तर आता माझ्या भावाचीही हवाई दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे माझे आई वडील आनंदीत आहे. त्यांचा आनंद पाहून मीही समाधानी आहे, असेही रोहिणी मिश्रा हिने सांगितले.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षणFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश