शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

कौतुकास्पद! शिक्षिकेच्या कार्याला सलाम; पहिल्या पगारातून गरीब मुलांना साहित्य वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 12:31 IST

स्नेहा शर्मा या शिक्षिकेने गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले. 

सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल हे सांगता येणार नाही. अनेकदा फोटो, व्हिडीओ आणि डान्स करून तरूणाई प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असते. पण, बिहारमधील एक शिक्षिका तिच्या कौतुकास्पद कार्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. आयुष्यातील पहिली नोकरी आणि पहिला पगार हा सर्वांसाठी खास असतो. याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. काही लोक त्यांच्या पहिल्या पगारातून अशा काही गोष्टींची खरेदी करतात, ज्या आठवणी म्हणून सोबत राहतात. अनेकजण आपल्या घरातल्यांना भेटवस्तू देऊन हा क्षण साजरा करत असतात. मात्र, बिहारमधील एका शिक्षिकेने गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले. 

बिहार लोकसेवा आयोगात कार्यरत असलेल्या शिक्षिका स्नेहा शर्मा यांनी अनेकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या पगारातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील बेगुसराय येथील या शिक्षिकेने पहिल्या पगारातून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना अभ्यासाचे साहित्य दिले. मुलांना दप्तर, पेन, पाण्याच्या बॉटल्स आदींचे वाटप करण्यात आले. स्नेहा यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

मुलांना दप्तरांचे वाटपस्नेहा शर्मा यांनी बीपीएससी परीक्षेत यश मिळवून शिक्षक होण्याचा मान पटकावला. त्या बेगुसराय येथील राधादेवी गर्ल्स मिडल स्कूलमध्ये कार्यरत आहेत. शिक्षिका झाल्यानंतर स्नेहा यांनी आपल्या आयुष्यातील पहिली कमाई इकडे-तिकडे खर्च करण्याऐवजी शाळेतील मुलांना साहित्य वाटप करून १२० विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. 

या शाळेतील इतरही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून शालेय साहित्य देत असतात. ही संस्था त्यांच्या फाऊंडेशनच्या वतीने आणि लोकांच्या सहकार्याने २०१९ पासून चालवली जात आहे. मुलांना शाळेत तायक्वांदोचे प्रशिक्षण देखील दिले जाते. या शाळेत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

टॅग्स :BiharबिहारInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीTeacherशिक्षक