शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'इन्स्पेक्टर' हरलीन मानच्या सुंदरतेने 'क्लीन बोल्ड', स्वतःला अटक करून घेण्याची मागणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:22 IST

पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. गणवेशावर हरलीन मान असं नाव लिहिलं आहे. 

आज इंटरनेटद्वारे तुम्ही कोणतीही माहिती मिळवू शकतात, देशासह जगभरात कोणते ट्रेंड सुरू आहेत याबाबतही तुम्ही माहिती घेऊ शकतात. इंटरनेटचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटादेखील आहे. कारण अनेकदा खोट्या बातम्या, अफवा येथे वाऱ्याच्या वेगानं पसरतात. अशीच एक घटना समोर आली आहे.  पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. गणवेशावर हरलीन मान असं नाव लिहिलं आहे. या सुंदर तरूणीचे फोटो पाहून अनेकजण अक्षरशः क्लीन बोल्ड झाले. लोकांनी तिच्याबाबत माहिती काढायला सुरूवात केली. अनेकांना ती पंजाब पोलिसात एसएचओ असल्याचं वाटलं. त्यानंतर तर लोकांनी तीचा फोटो शेअर करून स्वतःला अटक करण्याची मागणी करायला सुरूवात केली, आणि अल्पावधितच फेसबुक, ट्विटर , व्हॉट्सअॅप आदी ठिकाणी हा फोटो भलताच व्हायरल झाला.

  सेल्या नावाच्या एका युझरने हरलीन मान, पंजाब पोलीस,लोकं अटक होण्यासाठी रांगेत उभे आहेत, असं म्हटलं.राकेश तिवारीने ट्विट करून, हरलीन मान, पंजाब पोलीस, कृपया मला अटक करा असं म्हटलं. 

पंजाब पोलीस एसएचओ, हरलीन मान, मी सरेंडर करतोय असं शिवेंद्र नावाच्या एका युझरने ट्विट केलं.  

पण या फोटोची सत्यता कळाल्यावर सगळेच हैराण झाले. कारण हा फोटो खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा नसून तो कायनात अरोरा नावाच्या एका अभिनेत्रीचा आहे. तिचा आगामी चित्रपट जग्गा ज्यूंदेईसाठी तिचा हा खास लूक आहे. ग्रॅंड मस्ती आणि खट्टा-मीठा यासारख्या चित्रपटात ती झळकली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर ती स्वतः पुढे आली. तोच फोटो शेअर करून हरलीन मान हे माझं आगामी सिनेमातील पात्र असल्याचं तिने सांगितलं. मी खरी पोलीस नाहीये, माझ्या फोनचा इनबॉक्स भरलाय, मला अटक करा अशे मेसेज लोक मला पाठवत आहेत. खूप जोक्स आणि फोटो मला फोरवर्ड केले जात आहेत.     हे समजल्यावर लोकांना मात्र हसावं की रडावं असं झालं होतं. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेट