आयएनएस कोलकाता नौदलाची शान

By Admin | Updated: August 14, 2014 03:29 IST2014-08-14T03:29:57+5:302014-08-14T03:29:57+5:30

जहाजावरुन शत्रूच्या अन्य जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताफ्यात सामिल झाली आहे.

INS Kolkata Navalachi Pride | आयएनएस कोलकाता नौदलाची शान

आयएनएस कोलकाता नौदलाची शान

मुंबई : जहाजावरुन शत्रूच्या अन्य जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताफ्यात सामिल झाली आहे. १६ आॅगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाला समर्पित केली जाणार असून या युध्दनौकेमुळे नौदलाची शान वाढली असल्याचे नौदल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आयएनएस कोलकाता युध्दनौका २0१0 मध्ये नौदलाकडे येणार होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात त्याचे काम पूर्ण होण्यास २0१४ साल उजाडले. ९ जून २0१४ रोजी ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी युध्दनौकेवरुन कारवार येथील समुद्रतटात केली.
सर्व चाचण्यांनतर ही युध्दनौका
१0 जुलै रोजी नौदलाकडे देण्यात आली.
या जहाजावर हवेत मारा करणारे सर्वात लांब पल्ल्याचे असे क्षेपणास्त्र तैनात केले असून रडारनुसार त्याच्या हालचाली होणारे हे पहिले जहाज आहे. १६४ मीटर लांबीचे, १८ मीटर रुंदीचे असे ७,५00 टन वजनाच्या या जहाजावरुन जमिनीवर आणि जहाजांना मारा करणारे १६ ब्राम्होसची क्षमता असणारे क्षेपणास्त्र तैनात केले आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे पाणबुड्यांना लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र, रॉकेट, छोट्या तोफा, सेंसरही बसवण्यात आले असून हॅलिकॉप्टरसाठी सोय केली आहे. १६ आॅगस्टला पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ती समर्पित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: INS Kolkata Navalachi Pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.