मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार आहे. त्यामुळे नौदलाच्या ताफ्यात पाणीबुडींची संख्या व एकूण क्षमता वाढणार आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुसऱ्या जहाजांच्या रडारला दिसत नाही; त्यामुळे युद्धकाळात त्याचा मोठा लाभ भारताला होऊ शकतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पाणीबुडीचं लोकार्पण होणार असून, पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येईल.स्कॉर्पिन श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी आहे. यापूर्वी कलवरी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. या पाणबुडीमध्ये शत्रूवर थेट हल्ला करण्याची क्षमता आहे. ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त कन्व्हेन्शनल डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी असून, पाण्यात आवाजाच्या तरंगावरून पाणबुडीचा शोध घेतला जातो; मात्र या पाणबुडीचा आवाज येत नसल्याने रडारवर ही पाणबुडी दिसत नाही. या पाणबुडीत शत्रूवर थेट हल्ला करण्याची तसेच कोणत्याही स्थितीत कार्यरत राहण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचा वेग प्रति तास 20 नॉटिकल मैल आहे. पाणीबुडीचा एका तासात कमाल वेग 35 ते 40 किमी आहे. ती सलग 45 दिवस पाण्यात राहू शकते. यावर 37 नौसैनिक तैनात असून, पाण्यात 300 मीटर खोल जाण्याची तिची क्षमता आहे. 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद व 12.3 मीटर उंच या पाणबुडीचे वजन 1,550 टन आहे. कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीमुळे 300 किमी अंतरापर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. रडार, सोनार, इंजिन व इतर 1 हजार लहान-मोठी उपकरणे यात देण्यात आलेली आहेत. समुद्रात गेल्यावर 12 हजार किमीपर्यंतचं अंतर पार करण्याची हिची क्षमता आहे. पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब असते.
आवाज नाही, फक्त काम; आयएनएस खांदेरी शत्रूवर भारी पडणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 09:01 IST
भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार आहे.
आवाज नाही, फक्त काम; आयएनएस खांदेरी शत्रूवर भारी पडणार!
ठळक मुद्देभारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आजपासून दाखल होणार नौदलाच्या ताफ्यात पाणीबुडींची संख्या व एकूण क्षमता वाढणार आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुसऱ्या जहाजांच्या रडारला दिसत नाही