हिंदू राष्ट्र सेनेच्या 15 कार्यकर्त्यांची चौकशी
By Admin | Updated: June 7, 2014 10:27 IST2014-06-07T00:47:27+5:302014-06-07T10:27:38+5:30
फेसबुकवर महापुरुषांच्या आक्षेपार्ह चित्रे टाकल्यानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावातून हडपसरमध्ये 28 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता़

हिंदू राष्ट्र सेनेच्या 15 कार्यकर्त्यांची चौकशी
>पुणो : फेसबुकवर महापुरुषांच्या आक्षेपार्ह चित्रे टाकल्यानंतर पुण्यात निर्माण झालेल्या तणावातून हडपसरमध्ये 28 वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली आह़े पुण्यातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी त्यांची कसून, चौकशी केली़
शेख मोहसीन मोहमंद सादिक (28) याचा सोमवारी रात्री हडपसर परिसरात खून झाला होता़ या घटनेचा तपास पुणो शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आह़े त्यात हिंदू राष्ट सेनेच्या विशाल गोविंद सुन्नावे, अतुल आगम, रणजीत यादव, सागर सुतार, शुभम बरडे, दादा मोडक, आकाश लष्करे यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आह़े या खुन प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे 17 आणि इतर अशा 25 जणांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत़ हडपसर पोलीस ठाण्यात यातील 15 जणांना आज आणण्यात आले होत़े त्यावेळी पुणो एटीएसचे पथक तेथे पोहचल़े त्यांनी याकडे चौकशी केली़
पोलिसांतर्फे आवाहन
सोशल नेटवर्किग साईट तसेच फेसबुकवर टाकण्यात आलेल्या अनेक गोष्टी या ख:या असतातच असे नाही़ त्यावर काही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आह़े