पाणलोट योजना कामाची चौकशी व्हावी
By Admin | Updated: May 12, 2014 18:15 IST2014-05-12T18:15:29+5:302014-05-12T18:15:29+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांसाठी राबविण्यात आलेल्या पाणलोट योजनेच्या कामाची चौकशी व्हावी, भ्रष्ट व बेजबाबदार अधिकार्यांवर तत्काळ कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिला आहे. अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

पाणलोट योजना कामाची चौकशी व्हावी
म कापूर : शाहूवाडी तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांसाठी राबविण्यात आलेल्या पाणलोट योजनेच्या कामाची चौकशी व्हावी, भ्रष्ट व बेजबाबदार अधिकार्यांवर तत्काळ कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिला आहे. अशा आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, शासनाने शाहूवाडी तालुक्यातील डोंगरी भागातील अल्प भूधारक शेतकर्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाने २०११ ते २०१४ पर्यंत पाणलोट विकास योजना राबविली. ही योजना नांदगाव, नांदारी, करंजफेण, गावडी, कंुभवडे, शित्तूरवारुण, अणुस्कुरा, विरळे, कडवे, आदी गावातील धनगरवाडे, आदी गावात बंधारे, जमीन सपाटीकरण या कामात अधिकार्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. निकृष्ट कामे करून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. शेतकर्यांच्या नावावर बोगस बिले काढून अधिकार्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. परप्रांतिय ठेकेदाराकडून कामे करून घेतली आहेत व स्थानिक शेतकर्यांच्या खोट्या सा करून बिले उचलली असल्याचा आरोप श्रीकांत कांबळे यांनी निवेदनात केला आहे. तरी या सर्व कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी भारतीय दलित महासंघाने केली आहे.(प्रतिनिधी)