आतील पानासाठी - मराठी विद्यार्थी अमराठीत निपूण! गुजराती, सिंधी, जपानी, पाली, पार्शियनचा १०० टक्के निकाल
By Admin | Updated: June 2, 2014 23:54 IST2014-06-02T23:54:09+5:302014-06-02T23:54:09+5:30
चंद्रकांत शेळके/अहमदनगर : महाराष्ट्रीयन विद्यार्थी मराठी भाषेपेक्षा अमराठी भाषांत निपूण आहेत. त्यांना मराठीपेक्षा इतर भाषा सोप्या वाटू लागत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालावरून निदर्शनास येते. पुणे विभागात गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात मराठी थेट नवव्या स्थानावर घसरली आहे. संस्कृत, जर्मन, फे्रंच या भाषांचा निकालही मराठीपेक्षा जास्त आहे.

आतील पानासाठी - मराठी विद्यार्थी अमराठीत निपूण! गुजराती, सिंधी, जपानी, पाली, पार्शियनचा १०० टक्के निकाल
च द्रकांत शेळके/अहमदनगर : महाराष्ट्रीयन विद्यार्थी मराठी भाषेपेक्षा अमराठी भाषांत निपूण आहेत. त्यांना मराठीपेक्षा इतर भाषा सोप्या वाटू लागत असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालावरून निदर्शनास येते. पुणे विभागात गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून, यात मराठी थेट नवव्या स्थानावर घसरली आहे. संस्कृत, जर्मन, फे्रंच या भाषांचा निकालही मराठीपेक्षा जास्त आहे.मराठीपेक्षा परप्रांतीय किंवा परदेशी भाषांचा अभ्याक्रम सोपा जात असल्याने उत्तीर्ण होण्याच्या खात्रीने विद्यार्थी या अमराठी भाषांची निवड करतात. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीत मराठी मुलांनाच उत्तीर्ण होण्याची शाश्वती नसल्याने ते तुलनेत सोप्या असलेल्या गुजराती, सिंधी, जापानी, पाली, संस्कृत, जर्मन, फे्रंच या परप्रांतीय किंवा परदेशी भाषांकडे वळाले आहेत. त्यातील गुजराती, सिंधी, जापानी, पाली, पार्शियन या भाषांचा निकाल शंभर टक्के लागला असून मराठीत ९७.८७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.पुणे विभागात मराठी विषयासाठी एकूण १ लाख ४३ हजार ८०९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील १ लाख ४० हजार ७४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फक्त पुणे विभागातच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार ६७ इतकी आहे. संस्कृत (९९.३४), जर्मन (९८.६६) व फे्रंच (९८.०९) या भाषांचा निकाल मराठीपेक्षा (९७.८७) जास्त आहे. ---------------४५ विषयांची शंभरीपुणे विभागात यंदा बारावीसाठी सर्व शाखांतील एकूण १४३ पैकी ४५ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला. त्यात परप्रांतीय, परदेशी भाषांसह चित्रकला, संगीत, बिल्डिंग मेंटेनन्स, मॅकॅनिकल टेक्नॉलॉजी, एक्सरे टेक्निशियन, ऑफथॅलमिक टेक्निशियन, बँकिंग, तसेच सीड, डेअरी, कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी आदी ४५ विषयांचे निकाल १०० टक्के आहेत. तर इनलँड फिशरीज या विषयाचा सर्वात कमी (८० टक्के) निकाल लागला.