आतील पान - स्मृती इराणी -
By Admin | Updated: June 7, 2014 00:36 IST2014-06-07T00:36:01+5:302014-06-07T00:36:01+5:30
अब्रुनुकसानीप्रकरणी स्मृती इराणींना कोर्टाचा समन्स

आतील पान - स्मृती इराणी -
अ ्रुनुकसानीप्रकरणी स्मृती इराणींना कोर्टाचा समन्सनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दाखल केलेल्या फौजदारी अब्रुनुकसानीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना आरोपी म्हणून समन्स जारी केला.महानगर दंडाधिकारी धीरज मित्तल यांनी हा समन्स जारी करताना इराणी यांना २७ सप्टेंबरपूर्वी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. निरुपम यांनी २० डिसेंबर २०१२ रोजी इराणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. इराणी यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेदरम्यान निरुपम यांच्याविरुद्ध अवमानजनक शब्दांचा वापर केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)