स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य
By Admin | Updated: September 14, 2014 02:44 IST2014-09-14T02:44:48+5:302014-09-14T02:44:48+5:30
कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.

स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य
नवी दिल्ली : न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. न्यायपालिकेचे स्वातंत्र्यही कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.
वरिष्ठ न्यायिक नियुक्त्यांसाठी असलेली कॉलेजियमची पद्धत रद्द करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर न्या. लोढा यांनी संसदेत नुकत्याच पारित झालेल्या कायद्याचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. परंतु न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. ‘रुल ऑफ लॉ कन्व्हेंशन 2क्14’ वरील चर्चासत्रला संबोधित करताना ते बोलत होते.
न्या. लोढा म्हणाले, न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी न्यायिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. कार्यपालिका अथवा अन्य कोणत्याही संस्थेकडून करण्यात येणा:या अन्यायाचे परिमाजर्न करण्यासाठी दाद मागण्याचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण या दृष्टीने लोक न्यायसंस्थेकडे पाहतात व म्हणूनच त्यांचा न्यायालयांवर विश्वास आहे.
वकीलवर्गाला आवाहन करताना न्या. लोढा म्हणाले, न्यायपालिकेची प्रतिमा कलंकित करण्याचे डावपेच खेळणा:या लोकांना दूर ठेवले पाहिजे. न्यायपालिकेतील कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ‘अपवित्रतेचे संरक्षण करणो’ आहे, जो लोकशाहीच्या विकासाच्या मार्गातील सर्वात वाईट आजार आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
427 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत असलेले न्या. लोढा म्हणाले, ‘मी या विषयावर (विधेयक) बोलणार नाही. परंतु मला अतिशय प्रिय असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याच्या मुद्याला हात घालू इच्छितो. ही अशी गोष्ट आहे, ज्याच्याशी कदापि तडजोड होऊ शकत नाही.
4उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात दोन दशकापेक्षा अधिक काळ म्हणजे 21 वर्षे न्यायाधीश राहिल्यानंतर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की न्यायपालिकेत आंतरिक शक्ती आहे आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही.
4देशातील कायदा व्यवस्थेचे राज्य बळकट होण्यासाठी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असण्याची गरज आहे. त्यासाठी देशाच्या न्यायसंस्थेची एकसंधता अबाधित राखणो महत्वाचे आहे. न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी न्यायाधीशांना आमिष दाखवण्याचे प्रकार थांबविणो ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.