शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

इन्फोसिसच्या सह-संस्थापकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; प्राध्यापकाला हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:28 IST

इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इतर १७ जणांवर एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kris Gopalakrishnan: कर्नाटक पोलिसांनीइन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक बलराम यांच्यासह  अन्य १६ जणांविरुद्ध एससी/एसटी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ७१ व्या शहर दिवाणी व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार सदाशिव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपालकृष्णन यांच्याकडून कोणतीही दिलेली नाही. मात्र इन्फोसिसचे सहसंस्थापक गोपालकृष्णन या प्रकरणात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

तक्रारदार दुर्गाप्पा हे आदिवासी बोवी समाजाचे असून ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी मेंबर होते. २०१४ मध्ये हनी ट्रॅपच्या खोट्या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा दुर्गाप्पा यांनी केला होता. या प्रकरणात अडकल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. आपल्याला जातीवरुन शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.

दुर्गाप्पा यांनी आयआयएससीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य गोपालकृष्णन आणि इतर अनेक प्राध्यापकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप केला. एफआयआरमध्ये आयआयएससीचे संचालक गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर आणि संद्या विश्वेश्वरैह यांच्यासह इतर प्रमुख शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत.

दुर्गाप्पा यांच्या तक्रारीत आयआयएससीमधील वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासकांकडून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. माझे पद आणि विश्वासार्हता कमी करण्यासाठी मला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचा दावा दुर्गाप्पा यांनी केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती आणि जमातींवरील गुन्ह्यांसाठी एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा कडक आहे आणि दोषी आढळल्यास तुरुंगवासासह कठोर शिक्षा होऊ शकते.

इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी २००७ ते २०११ पर्यंत कंपनीचे संचालक आणि २०११ ते २०१४ पर्यंत उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले गोपालकृष्णन यांनी भारतीय उद्योग महासंघाचे  अध्यक्ष आणि दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाचे सह-अध्यक्ष अशा प्रतिष्ठित भूमिका निभावली होती. यासोबत गोपालकृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास येथून भौतिकशास्त्र आणि संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रिस हे इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअर्सचे सहकारी आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स  संस्थेचे मानद सहकारी आहेत. 

टॅग्स :Infosysइन्फोसिसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस