शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 22:18 IST

हैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे.

तेलंगणा- हैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे. तेलंगणा सरकारनं राज्य भिका-यांपासून मुक्त करण्यासाठी नवी योजना प्रत्यक्षात आणली आहे. या योजनेंतर्गत 1 डिसेंबरपासून भिका-यांची माहिती देणा-या व्यक्तीला सरकारतर्फे 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.विशेष म्हणजे पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षानंही या सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका व राज्य सुधारात्मक प्रशासन संस्था यासाठी एकत्रितरीत्या काम करणार आहेत. तसेच आतापर्यंत बेघर असलेल्या भिका-यांना शासकीय आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. तसेच यापुढेसुद्धा भिका-यांना सरकारी आश्रयस्थानात ठेवण्यात येणार असल्याची माहिती तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे.आमचा राज्यातील सर्व रस्त्यांना भिकारीमुक्त करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही 1 डिसेंबरपासून भिका-यांची माहिती देणा-या व्यक्तीला 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हैदराबाद भीक मागणे प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येणार असून, भिका-यांच्या ठिकाणांची माहिती देणा-यांना आम्ही 500 रुपये देणार आहोत, असंही तेलंगणाचे पोलीस महासंचालक म्हणाले आहेत.  इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौ-याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी काळजी घेण्यात येत आहे. तेलंगणातील चंचलगुडा तुरुंग व चेरलापाली तुरुंगाजवळील आनंद आश्रमात रस्त्यावर भीक मागणा-या आतापर्यंत 111 पुरुष, 91 महिला आणि 10 चिमुकल्यांना ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या अंगठ्याचे निशाण व फोटो घेण्यात आले आहेत. हैदराबादेतील बेगिंग अ‍ॅक्ट 1977अंतर्गत भीक मागताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला सहा महिने ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. परंतु भिका-यांवरील ही बंदी फक्त दोन महिन्यांसाठीच मर्यादित असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त एम. महेंद्र रेड्डी यांनी दिली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या हैदराबाद दौ-याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी उपाययोजना करण्यात येत आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊनच शहरात भिका-यांना भीक मागण्यास दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या दौ-यादरम्यान हैदराबादमध्ये भिका-यांना भीक मागता येणार नाही. 8 नोव्हेंबर 2017 ते 7 जानेवारी 2018 पर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, नाक्यावर भीक मागणं किंवा लहान मुलांना अथवा अपंग व्यक्तींना भीक मागण्यास भाग पाडणं हा गुन्हा ठरणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणा-याला दंड ठोठावला जाईल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हैदराबाद दौ-यावेळीही अशाच प्रकारे भीक मागण्यास बंदी घातली होती. इवांका ट्रम्प 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबादमध्ये होणा-या जागतिक उद्योजगता परिषदेत सहभागी होण्यासाठी येणार आहे. त्यानंतर शहरात विश्व तेलगू संमेलन सुरू होईल. हे संमेलन 5 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये हजारो तेलुगू एनआरआय सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.

टॅग्स :BeggarभिकारीIvanka Trumpइवांका ट्रम्प