शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:46 IST

२०१६ मध्ये दाखल आरटीआय याचिकेच्या आधारे, सीआयसीने दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रॅज्यूएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा करण्याचा आदेश दिला होता..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रॅज्यूएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा करण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश दिल्लीउच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दिल्ली विद्यापीठाने केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाला आव्हान दिले होते. २०१६ मध्ये दाखल आरटीआय याचिकेच्या आधारे, सीआयसीने दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्रॅज्यूएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा करण्याचा आदेश दिला होता..

'शैक्षणिक नोंदी आणि डिग्रीचा खुलासा करणे बंधनकारक नाही' -दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या आदेशानुसार, शैक्षणिक नोंदी आणि डिग्रीचा खुलासा करणे बंधनकारक नाही. पंतप्रधान मोदी यांच्या शैक्षणिक नोंदी उघड करण्यासंदर्भात, ही कायदेशीर लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासंदर्भात माहिती अधिकारांतर्गत (आरटीआय) अर्ज दाखल केल्यानंतर, केंद्रीय माहिती आयोगाने २१ डिसेंबर २०१६ रोजी, १९७८ मध्ये बीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी तपासण्याची परवानगी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.

CIC ने दिले होते डिग्री सार्वजनिक करण्याचे आदेश -विद्यापीठाने तिसऱ्या पक्षाशी संबंधित माहिती सामूहिक न करण्याच्या नियमांचा हवाला देत हे अस्वीकार केले होते. मात्र, मुख्य माहिती  आयोगाने (सीआयसी) हा तर्क स्वीकार केला नाही आणि डिसेंबर 2016 मध्ये डीयूला निरीक्षणाची परवानगी दिली. सीआयसीने म्हटले होते की, कुठलीही सार्वजनिक व्यक्ती विशेषतः पंतप्रधानांची शैक्षिक योग्यता पारदर्शक असायला हवी. एवढेच नाही तर, ही माहिती असेले रजिस्टर एक सार्वजनिक दस्तऐवज मानले जावे, असेही सीआयसीने  म्हटले होते. 

यानंतर, सीआयसीच्या या आदेशाविरुद्ध विद्यापीठाने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. याथे विद्यापीठाचे प्रतिनिधत्व भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि त्यांच्या कायदेविषयक चमूने केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयdelhiदिल्लीBJPभाजपा