शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
2
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
3
अजित पवारांकडून जाहीरपणे समाचार, पण चंद्रकांत पाटलांनी संयम दाखवला; नेमकं काय घडलं?
4
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
5
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
6
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
7
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा
8
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
9
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
10
९ वर्षांपासून फरार, FBI ने गुजराती तरुणावर ठेवले २०८००००० रुपयांचे बक्षीस, कोणता गुन्हा केलाय?
11
ऋतुजा बागवेची नवीन हिंदी मालिका 'माटी से बंधी डोर', प्रोमोला मिळतेय पसंती
12
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
13
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
14
गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!
15
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
16
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
17
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
18
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
19
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
20
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत

ऑनलाइन सट्ट्याच्या जाहिराती दाखवू नका, I&B मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 7:23 PM

Ministry of I&B: सध्या विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्ट्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. याबाबत सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.

नवी दिल्ली: सध्या विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्ट्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. याबाबत सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाला इशारा देत ऑनलाइन बेटिंगच्या जाहिराती टाळण्यास सांगितले आहे.

ऑनलाइन सट्ट्याची जाहिरात दिशाभूल करणारी सरकारने इशारा दिला की, देशाच्या बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. यामुळे तरुण मुलांसाठी प्रचंड आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक धोके निर्माण होत आहेत. ऑनलाइन सट्ट्याच्या जाहिराती प्रतिबंधित क्रियाकलापांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. या जाहिराती फसव्या आहेत आणि त्या ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन अॅक्ट, 1995 आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया अॅक्ट, 1978 अंतर्गत जाहिरात कोडने विहित केलेल्या पत्रकारितेच्या आचरणाच्या मानकांशी सुसंगत नाहीत.

अॅडव्हाजरीमध्ये सल्ला दिलासरकारने हा इशारा व्यापक सार्वजनिक हितासाठी जारी केला आहे. तसेच, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिराती प्रकाशित करणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 डिसेंबर 2020 रोजी खाजगी सॅटेलाईट टीव्ही चॅनेलसाठी एक अॅडव्हाजयरी जारी केली होती, ज्यात प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातींसाठी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींवर जाहिरात मानक परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले होते.

सट्टेबाजीच्या जाहिरातींना मुले बळी पडतात गेल्या काही वर्षांपासून विविध वेबसाइट्सवर सट्टेबाजीच्या जाहिराती पाहायला मिळत होत्या. अशा जाहिरातींमध्ये हाय-स्पीड चेतावणी देखील दिली जाते की, बेटिंग गेम काळजीपूर्वक खेळा, ते व्यसन असू शकते. अलीकडच्या काळात अनेक तरुणांना जाहिरातींमधून सट्टेबाजीचे व्यसन लागलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे, देशात सोशल मीडियाच्या विस्तारामुळे सट्टेबाजीच्या जाहिरातींचा लक्षणीय विस्तार झाला आहे.

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयAdvertisingजाहिरात