शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 14:33 IST

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा राज यांनी केला होता

मुंबई: राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा काल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केला होता. यावर आता शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आहे. दंगलीबद्दलची माहिती असेल, तर पोलिसांना कळवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी काल केला. ओवैसी बंधूंच्या दतीनं देशात दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचं राज यांनी म्हटलं. हा दावा करताना राज यांनी दिल्लीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या फोनचा हवाला दिला. ते विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. 'आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात मोठ्या दंगली घडवण्याचं कारस्थान रचण्यात येत आहे. ओवैसी बंधूंच्या मदतीनं या दंगली घडवल्या जाऊ शकतात,' असा दावा राज यांनी केला होता. राज यांच्या दाव्याची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे. 'दंगलीच्या कटाची माहिती असेल, तर पोलिसांना त्याबद्दलची माहिती द्या,' असा टोला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा