शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:47 IST

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.

नवी दिल्ली : काही देशद्रोही आणि गरीबविरोधी शक्ती सध्या देशात वैमनस्य व हिंसाचाराचे विष पसरवीत आहेत व देशाच्या लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर आडून टीका केली.सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे व लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्त आधी ध्वनिमुद्रित करून पाठविलेल्या हिंदी संदेशात सोनियाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेला काही काळ देशाचा गाडा रुळावरून घसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. त्याने देशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत.

आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले वैमनस्य आणि हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत.प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, विधानसभा अध्यक्ष चरन दास महंत व राज्याचे मंत्री उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल हजेरी लावली.लोकांचा आवाज दडपू पाहत आहेतकोणाचेही थेट नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की, ते देशातील लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत. तरुण पिढी, आदिवासी, महिला, शेतकरी, छोटे दुकानदार व जवान अशा सर्वांची तोंडे ते बंद करू पाहत आहेत. केवळ विधानसभेची भव्य वास्तू बांधून लोकशाहीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन अविरतपणे झटावे लागेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसdemocracyलोकशाही