महागाई 3.74 टक्क्यांवर
By Admin | Updated: September 16, 2014 01:30 IST2014-09-16T01:30:09+5:302014-09-16T01:30:09+5:30
भाज्या व खाद्यपदार्थाच्या किमतीत काहीशी घट झाल्यामुळे ऑगस्टमध्ये चलनवाढ 3.74 टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात कमी चलनवाढ आहे.

महागाई 3.74 टक्क्यांवर
नवी दिल्ली : भाज्या व खाद्यपदार्थाच्या किमतीत काहीशी घट झाल्यामुळे ऑगस्टमध्ये चलनवाढ 3.74 टक्क्यांवर आली. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात कमी चलनवाढ आहे. रिझव्र्ह बँकेने व्याजदरात कपात न करण्याची भूमिका घेतल्यामुळे या घटलेल्या चलनवाढीचा दिलासा उद्योगांना होणार नाही.
घाऊक ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर चलनवाढ मोजली जाते. ही जुलैमध्ये 5.19, तर गेल्या वर्षी जुलै महिन्यातच ती 6.99 टक्के होती. ऑगस्टमधील ही चलनवाढ ऑक्टोबर 2क्क्9 पासूनची सगळ्यात कमी होती. तेव्हा ती 1.8 टक्के होती. अधिकृत माहितीनुसार खाद्यान्नाच्या किमती 5.15 टक्के वाढल्या. तो दर जुलै महिन्यात 8.43 टक्के होता. भाजीपाल्याच्या किमती ऑगस्टमध्ये 4.88 टक्के वाढल्या; परंतु त्या सलग तिस:या महिन्यापासून घसरत आहेत. कांद्याच्या किमतीत 44.7 टक्के घट झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्महागाई 3.74 टक्क्यांवर आल्याच्या पाश्र्वभूमीवर देशातील उद्योगजगताने पुन्हा एकदा रिझव्र्ह बँकेकडे आगामी पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची मागणी केली आहे. तसेच भांडवल खर्चात कपात करण्यासाठी उद्योगांचा रेटा आहे.
च्पीएचडी चेंबरचे अध्यक्ष शरद जयपुरिया म्हणाले, उद्योगजगत चढे व्याजदर आणि महाग कच्च माल व वेतनवाढीच्या समस्येने त्रस्त आहे. या पाश्र्वभूमीवर उद्योग क्षेत्रला पुन्हा वृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी रेपो दरात कपातीद्वारे पतधोरणात लवचिकता आणण्याची गरज आहे. दरम्यान, येत्या 3क् सप्टेंबर रोजी रिझव्र्ह बँक पतधोरणाचा द्विमासिक आढावा सादर करणार आहे.