शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये आयएसची घुसखोरी? उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 08:49 IST

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान...

नवी दिल्ली - नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोऱ्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. तसेच शुक्रवारी काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा दहशतवादीसुद्धा आयएसशी संबंधित होता, असा दावा या संघटनेने केला आहे.  इस्लामिक स्टेटच्यावतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यामध्ये विलाय ए हिंद म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्यात जम्मू काश्मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दहशतवादी संघटनेशी संबंधित काही लोकांना सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीवेळी या संदर्भातील माहिती दिली होती.   तसेच इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तो आपल्या संघटनेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांचा उल्लेख करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे इस्लामिक स्टेनने केलेल्या दाव्याबाबतची चिंता वाढली आहे. बगदादीच्या या व्हिडीओत ईस्टर संडे दिवशी श्रीलंकेत घडवून आणलेल्या स्फोटांचाही उल्लेख होता. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या कारवायांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सावध भूमिका घेतली असून, या संघटनेच्या प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे.  आतापर्यंत इस्लामिक स्टेटकडून खोरासान प्रांताचा उल्लेख करण्यात येत असे, त्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशात कारवाया वाढवण्याचा त्याचा प्रयत्न असे.मात्र आता थेट जम्मू काश्मीरमध्ये कारवाया करण्याचे संकेत इस्लामिक स्टेटकडून देण्यात येत आहेत. त्यासाठी या संघटनेकडून स्थानिक दहशतवाद्यांसोबतही वाटाघाटी सुरू आहेत.   

टॅग्स :ISISइसिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादIndiaभारत