पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:23 IST2025-04-23T09:16:54+5:302025-04-23T09:23:03+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Infiltration attempt in Uri after Pahalgam terror attack fails; Encounter continues between army and terrorists | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आज बुधवारी उत्तर काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. आज उत्तर काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते, पण लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. सध्या दहशतवादी आणि लष्करांमध्ये चकमक सुरू आहे.

काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश

भारतीय सैन्याने सांगितले की, बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. आज २३ एप्रिल २०२५ रोजी, सुमारे २-३ UAH दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे. 

लष्कराने सांगितले की, नियंत्रण रेषेवरील सतर्क सैनिकांनी घुसखोरांना आव्हान दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सध्या ऑपरेशन सुरू आहे.

पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू

काल मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Infiltration attempt in Uri after Pahalgam terror attack fails; Encounter continues between army and terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.