वाढीव घरप˜ीस उद्योजकांचा आक्षेप हरकतींवर सुनावणी : चुकीच्या आकारणीचा आरोप

By Admin | Updated: May 30, 2014 00:32 IST2014-05-29T23:31:57+5:302014-05-30T00:32:17+5:30

सातपूर : महापालिकेने अभियंत्यामार्फत सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे मोजमाप करून सुधारित घरप˜ीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, त्यासाठी लावलेले दर अवास्तव असल्याचे आक्षेप उद्योजकांनी घेतले असून, त्यावर आज सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी झाली.

Industrialists' objection to hoodwinking Hearing on objections: Accusations of wrong charging | वाढीव घरप˜ीस उद्योजकांचा आक्षेप हरकतींवर सुनावणी : चुकीच्या आकारणीचा आरोप

वाढीव घरप˜ीस उद्योजकांचा आक्षेप हरकतींवर सुनावणी : चुकीच्या आकारणीचा आरोप

सातपूर : महापालिकेने अभियंत्यामार्फत सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे मोजमाप करून सुधारित घरप˜ीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, त्यासाठी लावलेले दर अवास्तव असल्याचे आक्षेप उद्योजकांनी घेतले असून, त्यावर आज सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी झाली.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांच्या मंजूर आणि प्रत्यक्षातील बांधकामांची मोजमापे घेऊन सुधारित घरप˜ी लागू करण्यासाठी महापालिकेने नुकतेच अभियंत्यांमार्फत सर्र्वेक्षण केले होते आणि नवीन कर आकारणीबाबत नोटिसा दिल्या होत्या. त्यावर ८३ उद्योजकांनी आक्षेप नोंदवले, तसेच उद्योजकांच्या निमा या संघटनेकडेदेखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज सातपूर विभागीय कार्यालयात सहायक आयुक्त चेतना केरुरे व नितीन नेर तसेच मनोज संगमनेरे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. ८३ पैकी ६३ उद्योजक सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. बीसीसी म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेला पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर त्यानुसार घरप˜ीच्या देयकात सुधारणा करण्याचे अधिकार्‍यांनी मान्य केले.
दरम्यान, सदरच्या सुनावणीपूर्वी निमाचे मंगेश पाटणकर, व्हीनस वाणी, माजी अध्यक्ष मधुकर ब्राšाणकर, विनीता धारकर, आयमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, सुधाकर देशमुख, महेंद्र छोरिया, सुभाष छोरिया यांनी सहायक आयुक्त चेतना केरुरे यांची भेट घेतली. १९८२ पासून कारखान्यांची मोजणी झाली नव्हती. ती करण्यात आली असून, नियमानुसार असलेली बांधकामे आणि अतिरिक्त बांधकामे याचा विचार करून घरप˜ी आकारणीसाठी नोटिसा दिल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले, तसेच हरकतींच्या सुनावणीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात योणार असल्याचेही स्पष्ट केले.
छायाचित्र एनएसके एडीटमध्ये आहे.

Web Title: Industrialists' objection to hoodwinking Hearing on objections: Accusations of wrong charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.