चीन महाराष्ट्रात उभारणार इंडस्ट्रियल पार्क

By Admin | Updated: September 18, 2014 16:21 IST2014-09-18T16:21:31+5:302014-09-18T16:21:31+5:30

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीन इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली आहे.

Industrial Park will be set up in China | चीन महाराष्ट्रात उभारणार इंडस्ट्रियल पार्क

चीन महाराष्ट्रात उभारणार इंडस्ट्रियल पार्क

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीन इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली आहे. आगामी पाच वर्षात चीन भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल असेही जिनपिंग यांनी जाहीर केले आहे. 
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौ-यावर असून  गुरुवारी भारत व चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केले. यात मोदी म्हणाले, आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा अशा विविध विषयांवर आम्ही गेल्या दोन दिवसांत चर्चा केली. नागरी अणू करारावरही दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चेचा सुरुवात होईल. सीमा प्रश्नावरही चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली असून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे असे मोदींनी सांगितले. चीनमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात भारतीय कंपन्यांवर घातलेले निर्बंधही मागे घ्यावे अशी मागणीही जिनपिंग यांच्याकडे केल्याचे मोदींनी नमूद केले. 

Web Title: Industrial Park will be set up in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.