Indrani Mukerjea Admitting Having Met Chidambaram And Karti Asked For Money | सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!
सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात इंद्राणी मुखर्जीने चौकशी अधिकाऱ्यांना दिलेल्या साक्षीमध्ये सांगितलं होतं की चिदंबरम यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी चिदंबरम यांनी त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या व्यवसायात मदत करण्यास सांगितले. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीकडे इंद्राणीचा तो व्हिडीओ आहे ज्यात तिने चिदंबरम यांच्या भेटीबाबतचा उल्लेख केला आहे. 

व्हिडीओच्या सुरूवातीला इंद्राणी मुखर्जी सांगते की तुम्हाला याची माहिती मिळेल. चिदंबरम यांच्याशी झालेल्या भेटीच्या वृत्तालाही ती दुजोरा देते. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद असा आहे की, 

रिपोर्टर - मला जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही 2008 मध्ये मंत्री चिदंबरम यांना भेटला होता का?
इंद्राणी - होय, कार्ती यांना भेटले होते. 
रिपोर्टर - कार्ती नव्हे तर मंत्री पी. चिदंबरम यांच्याशी तुमची मुलाखत झाली होती का?
इंद्राणी - होय, 2007 मध्ये भेटलो होतो. 
रिपोर्टर - तेव्हा चिदंबरम यांनी काय सांगितले होते ज्यावेळी तुम्ही त्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये भेटला होता?
इंद्राणी - ते तुम्हाला माहिती पडेल, मी ही माहिती देऊ शकत नाही ती गोपनीय आहे. 
त्यानंतर कार्ती चिदंबरम यांच्या खोट्या बोलण्याच्या आरोपावर इंद्राणी मुखर्जीने उत्तर दिलं. तुम्ही वारंवार खोटं बोलत आहात असं कार्ती चिदंबरम सांगत आहे असा प्रश्न रिपोर्टरने विचारला. 
इंद्राणी - ते तुम्हाला माहित पडेल, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू शकतात. 
रिपोर्टर - काय खरचं मंत्री चिदंबरम यांनी तुम्हाला सांगितलं होतं का की त्यांचा मुलगा कार्तीला मदत करा?

इंद्राणी - मी याठिकाणी काहीच सांगू शकत नाही, सगळं तुम्हाला माहित पडेल. हो, त्यांना सांगितलं होतं. पण मी इथे काही बोलू शकत नाही. तुम्हाला माहित हवं मी काय बोलते. हे सर्व गोपनीय आहे. 
रिपोर्टर - त्यांचे तुमच्याशी नेमकं काय बोलणं झालं होतं?
इंद्राणी - मी नाही सांगू शकत. हे खरोखरचं गोपनीय आहे. 
रिपोर्टर - आम्हाला फक्त हे समजून घ्यायचं आहे की, चिदंबरम त्यांच्या वकिलांना वारंवार सांगतायेत की तुम्ही खोटं बोलत आहात
इंद्राणी - मला काही फरक पडत नाही ते त्यांच्या वकिलांना काय सांगतायेत ते. ही माझी समस्या नाही. मी फक्त एक साक्षीदार आहे त्यामुळे मला काही त्रास नाही. 
रिपोर्टर - त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? कार्तीला मदत करा असं चिदंबरम बोलले होते का?
इंद्राणी - होय, त्यांना मला हे सांगितले होते. 
रिपोर्टर - जेव्हा तुम्ही कार्ती यांना भेटला होता त्यावेळी कार्तीने तुमच्याकडे पैशांची मागणी केली होती का?
इंद्राणी - होय, त्यांनी हे केलं होतं. 
रिपोर्टर - मागणी किती केली होती?
इंद्राणी - 1 मिलियन डॉलर
रिपोर्टर - कार्तीने स्पष्ट शब्दात तुमच्याकडे ही मागणी केली होती?
इंद्राणी - होय
रिपोर्टर - हे सर्व तुम्ही कोर्टात कॅमेरासमोर सांगितलं होतं का?
इंद्राणी - होय, मी सांगितलं होतं. 


रिपोर्टर - पिता-पूत्र दोघांचेही असं म्हणणं आहे की, तुमच्या सारख्या महिलेवर विश्वास ठेऊ शकत नाही?
इंद्राणी - ती त्यांची समस्या आहे त्या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवावा की नाही. 
रिपोर्टर - आपण पैसे दिले होते का?
इंद्राणी - कोर्टाला माझ्यावर विश्वास आहे, हे तुम्हाला माहित पडेल. 
(हा व्हिडीओ 2008 चा आहे)


Web Title: Indrani Mukerjea Admitting Having Met Chidambaram And Karti Asked For Money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.