शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

VIDEO : जबरदस्त आयडिया; येथे लॉकडाउनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांना पकडणार 'भूत'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 16:45 IST

येथे पोलिसांचे काही  स्वयंसेवक आता भूताच्या वेशात रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जे लोक लॉकडाऊनचे पालन करत नाहीत त्यांना हे स्वयंसेवक घाबरवून घरी पाठवत आहेत. 

ठळक मुद्देइंदूर पोलिसांचा अफलातून फंडा यासाठी तयार करण्यात आला आहे 6 जणांचा गट इंदूरमध्ये आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण

इंदूर : कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. बडेबडे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. आता कोरोनाने आपल्या देशातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दिवसांत सरकारने काही नियमांचे पालनही करायला सांगितले आहे. मात्र, असे असतानाही आपल्या देशातील बरेच लोक अजूनही रस्त्यांवर फिरताना आणि निमांना पार हरताळ फासताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इंदूर पोलिसांनी आता जबरदस्त फंडा सुरू केला आहे. यातून ते जनतेत जागृतीही करताना दिसत आहेत.

इंदूरमधील पोलिसांचे काही स्वयंसेवक आता भूताच्या वेशात रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जे लोक लॉकडाऊनचे पालन करत नाहीत त्यांना हे स्वयंसेवक घाबरवून घरी पाठवत आहेत. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर पोलिसांनी काही सामाजिक कार्याकर्त्यांची मदत घेतली आहे. हे कार्यकर्ते आता झोपड्या आणि गर्दी असलेल्या कॉलनीजमध्ये जाऊन लोकांना घाबरवत आहेत आणि त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देऊन घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. यासाठी त्यांनी 6 सामाजिक कार्यकर्त्यांचा एक गट तयार केला आहे. 

पोलिसांनी तयार केलेला यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत इंदूरमध्ये 89 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 86 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा होती. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंडन केले आहे. मात्र देशात असे नऊ हॉट स्पॉट्स आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्समिशन असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारतPoliceपोलिसSocialसामाजिक