शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

'तिच्या'साठी काय पण! लग्नाच्या 8 वर्षांनी पत्नीचं दुसऱ्यावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 08:37 IST

After 8 years marriage husband divorced his wife meet her lover : लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर  पतीनेच घटस्फोट देऊन त्या दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अशीच एक अजब घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदूरमध्ये (Indore) घडली आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर  पतीनेच घटस्फोट देऊन त्या दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नातेवाईकांसह सर्वच जण हैराण झाले आहेत. विजय नगरमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने सहमतीने घटस्फोट घेतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीची पत्नी प्रियकरासोबत लग्न करू इच्छित होती. हैराण करणारी बाब म्हणजे लग्नाला 8 वर्ष झाल्यानंतर आता महिला एका व्यक्तीच्या प्रेमात पडली असून तिला एक 5 वर्षांची मुलगीदेखील आहेत. या प्रकरणात न्यायालयासमोर पतीने आपली बाजू मांडली. या अर्जात त्यांनी स्पष्ट केलं होतं की, पत्नीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी ही व्यक्ती पत्नीला घटस्फोट देत आहे. तसेच याचा स्वीकार करत महिलेने देखील न्यायालयात सांगितलं की, मी दुसऱ्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते. 

न्यायालयाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अर्जाचा स्वीकार केला आणि दोघांना वेगळं होण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचं लग्न 8 वर्षांपूर्वी 2013 मध्ये लग्न झालं होतं आणि त्यांना 5 वर्षांची मुलगीदेखील आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. याच दरम्यान महिला दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि महिलेने त्या तरुणासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ऐकलं नाही. पतीने आपल्या पत्नीचा आनंद त्यातच आहे हे लक्षात घेऊन तिच्या लग्नाला परवानगी दिली.

संतापजनक! हुंड्यामध्ये कार आणि 5 लाख न दिल्याने सासरचे झाले हैवान; विवाहितेवर 12 जणांकडून बलात्कार

देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंड्यामध्ये एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून सासरची मंडळी हैवान झाली. विवाहितेवर कुटुंबातील 12 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत