शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:11 IST

Raja Raghuvanshi : शिलाँगच्या टेकडीवर सोनमचा रेनकोट सापडला. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणार नव्हते असं म्हटलं आहे. 

मध्य प्रदेशातील इंदूर येथून हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या कपलसोबत भयंकर घडलं आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे अचानक बेपत्ता झाले होते. ११ दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला. पण सोनम अजूनही बेपत्ता आहे, पोलीस पथक तिचा शोध घेत आहे. शिलाँगच्या टेकडीवर सोनमचा रेनकोट सापडला. कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणार नव्हते असं म्हटलं आहे. 

राजा रघुवंशीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, "राजा आणि सोनम शिलाँगला नाही तर हनिमूनसाठी श्रीलंकेला जाणार होते. कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर, कोणीतरी त्यांना शिलाँग चेरापुंजी फिरण्याचा सल्ला दिला. त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की, मेघालय हे खूप सुंदर ठिकाण आहे. शिलाँगला फिरायला जा. त्यानंतर राजा आणि त्याच्या पत्नीने आपला प्लॅन बदलला आणि ते शिलाँगला गेले."

मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता

"हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले असते तर त्यांचा जीव गेला नसता”

"जर राजा आणि सोनम हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले असते तर त्यांचा जीव गेला नसता. राजा आणि सोनमला माहित नव्हतं की, तिथे इतका धोका आहे किंवा कुटुंबातील सदस्यांनाही याची माहिती नव्हती, अन्यथा आम्ही त्यांना जाऊ दिलं नसतं. मी लहानपणापासून हातांनी त्याला भरवलं आणि आज डोळ्यांनी मी त्याची अंत्ययात्रा पाहिली. आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कालपर्यंत कुटुंबात आनंद होता आणि आज दु:ख आहे. सून सोनम कुठे आहे, तिची काय अवस्था असेल. याचा विचार करून मन अस्वस्थ होत आहे."

"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?

“माझी मुलगी कुठे असेल, ती कशी असेल?”

शिलाँगमध्ये बेपत्ता झालेल्या सोनमबद्दल अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचे कुटुंबीय चिंतेत आहेत. सोनमची आई आता फक्त देवाला प्रार्थना करत आहे की, माझी मुलगी जिथे कुठेही असेल तिला शोध आणि लवकर परत आण. माझा जावई गेला आहे, माझी मुलगी लवकर घरी यावी. आई कामाख्या, मी तिला तुझ्याकडे पाठवलं, आता मला फक्त काळजी वाटतेय, माझी मुलगी कुठे असेल, ती कशी असेल? मी शेवटचं २३ तारखेला सोनमशी बोलले होते असं सांगितलं. सोनमच्या कुटुंबाने संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस