शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:48 IST

Indore Couple Missing Case: सोनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

Indore Couple Missing Case: मेघालयात बेपत्ता झालेल्या इंदूर दाम्पत्याच्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर, आज(९ जून) त्यांची पत्नी सोनम हिला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून अटक करण्यात आली आहे. सोनमनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

सोनमसह मध्यप्रदेश आणि यूपीतील ३ हल्लेखोरांनाही अटक करण्यात आले आहे. एक आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

काय आहे प्रकरण?हे प्रकरण मध्य प्रदेशातून सुरू होते. सोनम आणि राजा यांचे लग्न ११ मे रोजी इंदूरमध्ये झाले. त्यानंतर २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. पण मेघालयात पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबातील सदस्यांचा या जोडप्याशी संपर्क तुटला. दोघांचेही फोन बंद येऊ लागले. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर दोघांना शोधण्यासाठी मेघालयाच्या डोंगरांमध्ये मोहिमा राबवण्यात आल्या. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

मेघालयात राजाचा मृतदेह सापडलाकाही दिवसांच्या शोधानंतर सोनमचे जॅकेट झुडुपात सापडले. त्यानंतर दोघांनी भाड्याने घेतलेली स्कूटीही पोलिसांना आढळली. अनेक प्रयत्नांनंतर २ जून रोजी पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत सापडला. पण सोनम अजूनही बेपत्ताच होती. एकीकडे इंदूरमध्ये राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे कुटुंब दुःखात बुडाले होते, तर दुसरीकडे सोनमचे कुटुंब तिच्या परतण्याची आशा करत होते. 

अखेर सोनम उत्तरप्रदेशात सापडलीमेघालय आणि मध्यप्रदेशात बरीच शोधाशोध केल्यानंतर सोनम अखेर उत्तरप्रदेशात सापडली. येथील गाजीपूरमध्ये नंदगंजच्या एका ढाबा मालकाचा ११२ क्रमांकावर फोन आला. त्याने पोलिसांना सांगितले की, सोनम ढाब्यात जेवायला आली आहे. यानंतर इंदूर पोलिसांनी गाजीपूर पोलिसांना सोनमला अटक करण्यास सांगितले. युपी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सोनम आणि इतर तीन आरोपींना अटक केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश