शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

तुझ्यासोबतच मरेन म्हणत प्रियकराची छतावरून उडी मारून आत्महत्या; प्रेयसीनं शेवटच्या क्षणी निर्णय बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:07 PM

छतावरून उडी मारल्यानं प्रियकराचा मृत्यू; पोलिसांनी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं

इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका प्रेम कहाणीचा दुर्दैवी शेवट झाला आहे. एकमेकांसोबत मरण्याची शपथ घेऊन प्रेमी युगुलानं छतावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. मात्र शेवटच्या क्षणी मुलीनं मुलाचा हात सोडला. मुलानं छतावरून उडी मारल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नकली केसांमधून सोनं तस्करी करणारे दोघे ताब्यात, हेअरस्टाइलने पोहोचवलं तुरूंगात!गुनामध्ये वास्तव्यास असलेला मोनू त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत इंदूरला पळून आला होता. या प्रेमी युगुलाला शोधत गुना पोलीस इंदूरला पोहोचले. पोलिसांना पाहताच दोघे छतावर पोहोचले आणि हा प्रकार घडला. इंदूरच्या मुसाखेडी भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी मोनूच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.स्वत:च्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या कर्जबाजारी व्यक्तीला ठोकल्या बेड्यामुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुना पोलिसांनी इंदूर पोलिसांच्या सहकार्यानं दोघांचा शोध सुरू केला. मोनू आणि त्याची प्रेयसी आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुसाखेडीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोनू राहत असलेलं ठिकाण गाठलं. पोलिसांना पाहताच मोनू आणि त्याची प्रेयसी छतावर गेले. दोघे सोबत जगणार नसू, तर सोबत मरू, अशी शपथ त्यांनी घेतली. यानंतर मोनूनं छतावरून उडी मारली. मात्र अल्पवयीन मुलीनं उडी घेतली नाही. पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे.या प्रकरणात पोलिसांनी मोनू आणि त्याची प्रेयसी राहत असलेल्या घराच्या मालकाची चौकशी केली. 'गुरु ओझा नावाची व्यक्ती मोनूला घेऊन ५ दिवसांपूर्वी आपल्याकडे आली होती. मोनूसोबत असलेल्या मुलीनं महिलांसारखा श्रृंगार केला होता. ती मोनूची पत्नी वाटत होती. मी त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली. त्यावर आम्हाला कागदपत्रं गुनावरून मागवावी लागतील, असं उत्तर त्यांनी दिलं,' अशी माहिती घर मालकानं दिली.