शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारत-कॅनडा तणाव; केवळ हत्येची माहिती हा सज्जड पुरावा नव्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 06:41 IST

अमेरिकेकडे दुर्लक्ष करत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न

हरीश गुप्तानवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आक्षेपार्ह आरोप केला होता. याला कारणीभूत ठरलेल्या दस्तावेजाची पुष्टी करणाऱ्या अमेरिकेच्या वरिष्ठ मुत्सद्द्याकडे दुर्लक्ष करून वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कॅनडाच्या पंतप्रधानांकडे इलेक्ट्रॉनिक गुप्तचरांची माहिती असली तरी केवळ तेवढीच पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकली जात नाही.

फाइव्ह आय क्लबमध्ये कॅनडाचा भागीदार असलेल्या अमेरिकेने हरदीप सिंह निज्जर याच्या कॅनडातील हत्येची इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता आहे. अमेरिकेने अशा प्रकारचे सहकार्य करण्याबाबत सांगितले होते, ते कॅनडाप्रमाणे भारताने नाकारलेले नाही. जस्टिन ट्रुडो यांच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांच्या पदावर नवीन नेतृत्व आल्यावरही अमेरिका संबंध पूर्ववत करू शकते. भारतही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या  २०२४च्या निकालाची प्रतीक्षा करेल.

भारताशी लढा म्हणजे... अमेरिकेला भारत आणि कॅनडामधून कोणाला निवडायचे असेल तर तो भारत आहे, असे वक्तव्य पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रूबीन यांनी केले होते. सामरिकदृष्ट्या भारत कॅनडाच्या तुलनेत खूपच महत्त्वाचा आहे आणि ओटावाने भारताशी लढा देणे म्हणजे मुंगीने हत्तीशी लढा देण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलटnमहिंद्रांनंतर जेएसडब्ल्यू स्टीलने धक्का देत कॅनडातील व्यवसाय गुंडाळण्याची तयारी सुरू केली. nदोघांतील स्टेकबाबतची चर्चा मंदावली आहे. भारत कॅनडाचा नववा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. 

घोषित केलेले फरार दहशतवादी परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन, वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान, कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन, जेएस धालीवाल- अमेरिका, सुखपाल सिंग- ब्रिटन,हरप्रीत सिंग उर्फ राणा सिंग- अमेरिका, सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन, कुलवंत सिंग उर्फ कांता- ब्रिटन, हरजाप सिंग उर्फ जप्पी सिंग- अमेरिका, रणजित सिंग नीता- पाकिस्तान, गुरमीत सिंग उर्फ बग्गा बाबा- कॅनडा, गुरप्रीत सिंग उर्फ बागी- ब्रिटन, जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई, गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया, लखबीर सिंग रोडे- कॅनडा, अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका, जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा, दुपिंदर जीत- ब्रिटन, एस. हिम्मत सिंग- अमेरिका

टॅग्स :IndiaभारतCanadaकॅनडा