शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

...तर सोनियांऐवजी 'ही' असती गांधी घराण्याची सून; इंदिरा गांधींना पसंत होती मुलगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 12:18 IST

राजकारणात प्रभावी असलेल्या गांधी नेहरू कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर परिवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. परंतु हे फार मोजक्याच लोकांना माहीत असावे, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतःचा मुलगा राजीव गांधींचं लग्न दिवंगत राज कपूर यांची मुलीशी करणार होते.

नवी दिल्ली- राजकारणात प्रभावी असलेले गांधी नेहरू कुटुंबीय आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर परिवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. परंतु हे फार मोजक्याच लोकांना माहीत असावे, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतःचा मुलगा राजीव गांधींचं लग्न दिवंगत राज कपूर यांच्या मुलीशी करणार होते. पत्रकार रशीद किदवई यांनी पुस्तकातून हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘नेता अभिनेता: बॉलिवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ हे पुस्तक लिहिलं आहे, त्यात हा खुलासा केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्यात गहन मैत्री होती आणि इंदिराजींच्या मनातही कपूर कुटुंबीयांबाबत प्रचंड आदर व सन्मान होता. पुस्तकातील माहितीनुसार, इंदिरा गांधींना वाटत होतं की, दोन्ही कुटुंबीयांमधील संबंध पुढे जावेत. त्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं लग्न राज कपूर यांची मोठी मुलगी ऋतूशी करण्याची इंदिरा गांधींची मनीषा होती. स्वतःच्या पुस्तकात रशीद लिहितात, असं नव्हे की इंदिरा गांधींना बॉलिवूड क्षेत्रातली सून हवी होती. त्यांना चित्रपटसृष्टीबाबत फार आत्मियता नव्हती, परंतु त्यांच्या मनात कपूर परिवाराबाबत नितांत आदर होता. राज कपूर यांच्या मुलीशी राजीव गांधींचं लग्न लावून देण्याची इंदिरा गांधींची इच्छा काही पूर्ण झाली नाही. राजीव गांधी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं जेव्हा ब्रिटेनला गेले तेव्हा केंब्रिज विद्यापीठात त्यांची ओळख सोनिया मायनो(सोनिया गांधीं)शी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले आणि त्यांनी 1968मध्ये लग्न केलं.रशीद पुस्तकात लिहितात, राज कपूर यांची नात आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरनंही 2002मध्ये राहुल गांधी आवडत असल्याचं सांगितलं होतं. तसेच राहुल गांधीही करिनाचा सिनेमा पहिला दिवस, पहिला शो पाहायला विसरायचे नाहीत, असं कथित स्वरूपात सांगितले जाते. एका टीव्ही शो कार्यक्रमादरम्यान जेव्हा करिनाला कोणाला डेट करायला आवडेल, असं विचारण्यात आलं. त्यावेळीही तिने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं. मला त्यांना समजून घेण्यात काहीही अडचण नाही, मी त्यांचे फोटो पाहिले आहेत. परंतु 2009मध्ये करिनानं या विधानावर करिनानं यू-टर्न घेतला आणि राहुल गांधी आवडत होते, असं म्हटलं. तसेच आम्ही दोघेही आडनावामुळे प्रसिद्ध असल्याचंही करिनानं यावेळी अधोरेखित केलं. त्यांना पंतप्रधान बनताना मी पाहू इच्छिते, परंतु नक्कीच मी त्यांना डेट करू इच्छित नाही, असा खुलासाही करिनानं केला होता.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRajiv Gandhiराजीव गांधी