इंदिरा गांधी देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान -सुरेश प्रभू

By Admin | Updated: March 24, 2016 01:51 IST2016-03-24T01:51:43+5:302016-03-24T01:51:43+5:30

इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान होत्या, या शब्दांत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

Indira Gandhi is the country's most influential Prime Minister - Sarvesh Prabhu | इंदिरा गांधी देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान -सुरेश प्रभू

इंदिरा गांधी देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान -सुरेश प्रभू

नवी दिल्ली : इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान होत्या, या शब्दांत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. जागतिक महिलादिनानिमित्त(८ मार्च) अलीकडेच दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अमेरिकेला अद्याप महिला राष्ट्राध्यक्ष मिळाला नसताना आपल्याकडे राष्ट्रपती, लोकसभाध्यक्षपद आणि पंतप्रधानपद महिलांनी भूषविले आहे, असे ते म्हणाले.
जगभरात अनेक महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांसाठी प्रभावी कामगिरीचे नवे मापदंड तसेच नवी कार्यसंस्कृती घालून दिली आहे. रेल्वेत अनेक महिला कर्मचारी चांगली कामगिरी करीत आहेत. सर्वसाधारणपणे अनेक क्षेत्रात त्या चांगल्या कामगिरी बजावत आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Indira Gandhi is the country's most influential Prime Minister - Sarvesh Prabhu