इंडिगोची ४७ तर गोएअरची १८ उड्डाणे रद्द; प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:50 IST2018-03-14T04:50:57+5:302018-03-14T04:50:57+5:30
विमानांचे इंजिन दोन आठवड्यांत तीनदा बिघडण्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगो व गोएअरच्या ११ विमानांच्या उड्डाणांना बंदी घातल्याचा मोठा फटका दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या प्रवाशांना मंगळवारी बसला आहे.

इंडिगोची ४७ तर गोएअरची १८ उड्डाणे रद्द; प्रवाशांना फटका
नवी दिल्ली : विमानांचे इंजिन दोन आठवड्यांत तीनदा बिघडण्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगो व गोएअरच्या ११ विमानांच्या उड्डाणांना बंदी घातल्याचा मोठा फटका दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या प्रवाशांना मंगळवारी बसला आहे.
या दोन्ही कंपन्यांना या विमानांच्या ६५ फेºया रद्द कराव्या लागल्या. सकाळी विमानतळांवर पोहोचलेल्या प्रवाशांना आपले विमान रद्द झाल्याचे समजले. दोन्ही कंपन्यांना दुसºया विमानांची व्यवस्था करणे शक्य नव्हते. अन्य कंपन्यांच्या विमानांची तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. परिणामी, त्या कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढविले.