इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 05:59 IST2025-12-12T05:57:02+5:302025-12-12T05:59:15+5:30
हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील.

इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
नवी दिल्ली : ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ज्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द किंवा विलंबाने झाले, त्या प्रत्येक प्रवाशाला १० हजार रुपये किमतीची ट्रॅव्हल व्हाउचर दिली जातील, अशी घोषणा इंडिगोने गुरुवारी केली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार जी भरपाई दिली जाते, त्यासोबत ही व्हाऊचर दिली जातील.
हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवाशांना पुढील १२ महिन्यांत इंडिगो विमानातून प्रवास करण्यासाठी वापरता येतील.
सरकारच्या नियमानुसार ५ ते १० हजार रुपये
विमान सुटण्याच्या आधीच्या चोवीस तासांच्या कालावधीत जर उड्डाण रद्द झाले असेल तर त्या प्रवाशाला प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये भरपाई सरकारी नियमांनुसार देण्यात येईल, असेही इंडिगोने म्हटले आहे.