शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची शक्यता; पूनावाला म्हणाले, "पुढील काही महिने जाणवणार लसींची कमतरता"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 11:15 AM

Coronavirus Vaccine : यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूद

ठळक मुद्देयापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं पूनावाला यांनी केलं नमूदसध्या देशात ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सरकारनं दिली परवानगी

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत देशात लसीकरण हा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात आली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. परंतु सध्या पुढील काही महिने लसींची कमतरता भासू शकते असं मत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं. "१० कोटी लसी उत्पादन करण्याची क्षमता जुलै महिन्यापूर्वी वाढू शकणार नाही," असंही त्यांनी नमूद केलं. सध्या देशात महिन्याला ६ ते ७ कोटी लसींचं उत्पादन करण्यात येत आहे. यापूर्वी आपल्याकडे तितक्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे क्षमतेचा विस्तार केला नसल्याचं अदर पूनावाला म्हणाले. फायनॅन्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. यामुळे आता लसींची कमतरता जुलै महिन्यापर्यंत भासणार असल्याचं म्हटलं जात आहे. "आमच्याकडे कोणतीही ऑर्डर नव्हती. आम्हाला वर्षाला १०० कोटींपेक्षा अधिक डोस उत्पादन करण्याची गरज भासेल असं वाटलं नव्हतं. तसंच जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येईल याचा अंदाजही अधिकाऱ्यांना नव्हता. प्रत्येकाला ही महासाथ संपुष्टात आल्याचंच वाटत होतं," असं पूनावाला म्हणाले. बदनाम करण्याचा प्रयत्नआपल्या कंपनीचा बचाव करताना पूनावाला यांनी लसीच्या कमतरतेबाबत राजकीय लोकांकडून आणि टीकाकारांकडून सीरम इन्स्टिट्यूटला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे यापूर्वी कोणताही आदेश नव्हता. तसंच वर्षाला १०० कोटी लसींच्या डोसचं उत्पादन  करावं लागेल असंही वाटलं नसल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. केंद्र सरकारनं सुरूवातीला सीरमकडून २.१ कोटी डोस मागवले होते. मार्च महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर सरकारनं ११ कोटी डोसची ऑर्डर दिली. सध्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. दरम्यान, सरकारनं आपल्या उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करण्याची परवानगीही कंपन्यांना दिली आहे.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या