इराकमध्ये भारतातील दहशतावादीही सक्रीय ?
By Admin | Updated: June 29, 2014 15:32 IST2014-06-29T15:31:29+5:302014-06-29T15:32:05+5:30
इराकमधील सुन्नी दहशतवाद्यांच्या बंडात भारतीय वंशांचा दहशतवादीही सक्रीय असल्याची माहिती गूप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

इराकमध्ये भारतातील दहशतावादीही सक्रीय ?
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९- इराकमधील सुन्नी दहशतवाद्यांच्या बंडात भारतीय वंशांचा दहशतवादीही सक्रीय असल्याची माहिती गूप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या दहशतवाद्याविरोधात गुप्तचर यंत्रणांनी लूकआऊट नोटीसही काढली आहे.
तामिळनाडूत जन्मलेला ३८ वर्षीय हाजी फकरुद्दीन उस्मान अली हा सध्या सिंगापूरचा नागरिक आहे. गापूरमध्ये सुपरस्टोअरमध्ये काम करत असताना उस्मानचा धार्मिक मिशनशी संबंध आला. यानंतर त्याने सिरीया व आता इराकमधील अंतर्गत संघर्षात सहभाग घेतल्याचे वृत्त आहे.
उस्मान अलीला कट्टरवादी बनवण्यात तामिळनाडूतील गुल मोहम्मद याचा मोठा हात होता. गुल मोहम्मदने नुकतेच भारतीय सुरक्षा यंत्रणांसमोर समर्पण केले असून चौकशीत त्याने अनेक तरुणांना कट्टरवादी बनवून सिरीयात पाठवले होते अशी कबूली दिली होती. त्यामुळे उस्मान अलीविरोधात भारतात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. या दशहतवाद्याने भारतात प्रवेश करु नये म्हणून विमानतळ आणि तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.