शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

भारताचा पाकिस्तानवर पुन्हा 'सर्जिकल स्ट्राईक', POK मध्ये 45 मिनिटं केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 11:53 AM

पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले.  

ठळक मुद्देभारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने लगेचच जशास तसे उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले.  भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या चार पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. 

शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. भारताने सोमवारी याच हल्ल्याचा हिशोब चुकता केला. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या. 

शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने आम्ही या नापाक कारवाईला उत्तर देऊ. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे. भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून 500 मीटर आतपर्यंत घुसले होते. 

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरुन पाकिस्तानी सैनिकांना जाळयात अडकवण्याचा ट्रॅप रचला होता. त्यानंतर लाईट मशिनगमधून फायरिंग केली त्यात चार सैनिक ठार झाले. जवळपास 45 मिनिटे ही कारवाई सुरु होती असे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे. स्थानिक कमांडरने परिस्थितीनुसार थेट पीओकेमध्ये घुसून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई पाकिस्तानसाठी एक इशारा आहे. यापुढे पाकिस्तानने भारतीय जवानांवर हल्ले केले तरच अशीच कारवाई करु असे सूत्रांनी सांगितले. मागच्यावर्षी उरी दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराच्या स्पेशल फोर्सेसने पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते. कालच पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीने भेट घेतली होती. त्याच दिवशी भारतीय लष्कराने ही कारवाई केली.  

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइक