वातावरण बदलाबाबत जबाबदारीचा मुद्दा सोडवा भारताची भूमिका : फ्रान्समध्ये होणार जागतिक परिषद

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:19+5:302015-02-06T22:35:19+5:30

नवी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.

India's role to solve the issue of climate change: The World Council will be held in France | वातावरण बदलाबाबत जबाबदारीचा मुद्दा सोडवा भारताची भूमिका : फ्रान्समध्ये होणार जागतिक परिषद

वातावरण बदलाबाबत जबाबदारीचा मुद्दा सोडवा भारताची भूमिका : फ्रान्समध्ये होणार जागतिक परिषद

ी दिल्ली : ग्लोबल वॉर्मिंगसाठी विकसित देशच ऐतिहासिकदृष्ट्या जबाबदार असून या गंभीर मुद्यावर वेगवेगळी जबाबदारी निश्चित केली जावी. कोणत्याही कराराप्रत पोहोचण्यापूर्वी जबाबदारीचा मुद्दा निकाली काढला जावा, असा रोखठोक संदेश भारताने दिला आहे.
या वर्षानंतर पॅरिसमध्ये होत असलेल्या संयुक्त राष्ट्र वातावरण परिषदेचे यजमानपद फ्रान्सकडे असून या परिषदेपूर्वी सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती व्हावी, असे आवाहन या देशाने गुरुवारी केले होते. वातावरण बदलाविरुद्ध सामायिक कृतीला भारताचा विरोध नाही, मात्र सर्व देशांची कृती क्षमतेनुसार समान असू शकत नाही ही भारताची भूमिका शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या चौकटीअंतर्गत (युएनएफसीसीसी) वातावरण बदलाबाबत करार केला जाईल. क्योटो कराराच्या जागी पॅरिसमध्ये नवा करार अस्तित्वात येणार असून भारतासह विकसनशील देशांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात समानतेचा पुनरुच्चार करताना क्षमतेनुसार जबाबदारी वेगवेगळी ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे, असे पर्यावरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार यांनी सांगितले.
---------------------
ग्लोबल वॉर्मिंगचे आव्हान...
ऊर्जा संसाधन संस्थेने(टेरी)सातत्यपूर्ण विकासावर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या परिषदेत कुमार यांनी भारताची भूमिका नमूद केली. ग्लोबल वॉर्मिंग पाहता तापमान दोन अंशानी कमी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकल्याचे पाहता सामायिक अशी कृती करण्याची गरज फ्रान्सचे विदेशमंत्री लॉरेंट फॅबिअस यांनी गुरुवारी या परिषदेत बोलताना व्यक्त केली.

Web Title: India's role to solve the issue of climate change: The World Council will be held in France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.