शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा रशियासोबत रायफल करार, अमेठीत उभारणार AK-203 चा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 11:07 IST

अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे रशियासोबत मिळून सात लाख 47 हजार कलाश्निकोव रायफल निर्माण करण्यासाठी करार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी संध्याकाळी घेतलाया करारांतर्गत उत्तर प्रदेशातील अमेठी येथे उभारण्यात येणार कारखाना दोन्ही देशांमध्ये याबाबतच्या करारावर या आठवड्या अखेरीस स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता

नवी दिली -  अमेरिकन कंपनीसोबत 72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदीसाठी करार केल्यानंतर भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी अजून एक मोठा करार करण्याबाबत निर्णय घेतला आहे. रशियासोबत मिळून सात लाख 47 हजार कलाश्निकोव रायफल निर्माण करण्यासाठी करार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी संध्याकाळी घेतला. या करारांतर्गत उत्तर प्रदेशातील अमेठी येथे कारखाना उभारण्यात येणार आहे.  भारत आणि रशियाच्या सरकारांमध्ये होणाऱ्या या करारांतर्गत रशियाची कलाश्निकोव कंसर्न आणि भारताची ऑर्डिंनन्स फॅक्टरी बोर्ड मिळून एके-47 च्या तिसऱ्या पिढीमधील एके-203 रायफल विकसित करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये याबाबतच्या करारावर या आठवड्या अखेरीस स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या करारासंदर्भातील रक्कम, कालावधी आणि अन्य महत्त्वपूर्ण माहिती समोर येईल.संरक्षण मंत्रालयाने साडे सहा लाख रायफल्सची खरेदी करण्यासाठी स्वारस्य पत्र मागवले होते. संरक्षण मंत्रालयाच्या त्याच प्रस्तावांतर्गत हा करार होत आहे. विशेष बाब म्हणजे या रायफल्सची निर्मिती मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतातच करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार कारखान्याचे 50.5 टक्के शेअर्स ऑर्डिन्स फॅक्टरीकडे तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असतील.  दरम्यान, केंद्र सरकारने  72 हजार 400 असॉल्ट रायफल खरेदी करण्यासाठी याच आठवड्यात एका अमेरिकन कंपनीसोबत करार केला आहे. फास्ट ट्रॅक प्रोक्टोरमेंटअंतर्गत एसआयजी जॉर असॉल्ट रायफल्ससाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याने म्हटले आहे.  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतrussiaरशिया