वॉशिंग्टन : भारतातील गहू व तांदूळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील सरकार मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते. हे धोरण व्यापारासाठी हानिकारक असल्याचा आरोप अमेरिकेने केला.अमेरिकेच्या व्यापार खात्याचे एक अधिकारी ग्रेगरी दौद यांनी अमेरिकी काँग्रेससमोर गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, भारतातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सबसिडीबद्दल गहू, तांदूळ पिकविणाºया जगातील सर्वच देशांना चिंता वाटत आहे. या दोन धान्यांच्या बाजारपेठीय किमतीसंदर्भात भारत सरकारकडून जी पावले उचलली जातात त्याबद्दल अमेरिकेची बाजू दौद यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या कृषीविषयक समितीपुढे मे महिन्यात मांडली होती. २०१० ते २०१४ या कालावधीत तांदळाला उत्पादन खर्चाच्या ७४ ते ८४.२ टक्के यामधील हमीभाव व गव्हाला उत्पादन खर्चाच्या ६०.१ ते ६८.५ टक्के यामधील हमीभाव भारताने देऊ केला होता व आपल्या देशातील या धान्य उत्पादकांना संरक्षण दिले होते, असा आरोप ग्रेगरी दौद यांनी केला आहे.
‘शेतकऱ्यांना सबसिडीचे भारताचे धोरण हानिकारक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 06:14 IST